गवताच्या खरेदीतही व्यापाऱ्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:35 AM2018-11-27T00:35:17+5:302018-11-27T00:35:37+5:30

शेती करपल्यानंतर पोवलीचा आधारही सुटतोय : प्रतिकिलो २ रु पये ४० पैसे ते ३ रु पये ६० पैसे असा नगण्य भाव

Looted by traders in the purchase of grass | गवताच्या खरेदीतही व्यापाऱ्यांकडून लूट

गवताच्या खरेदीतही व्यापाऱ्यांकडून लूट

Next

पालघर : शेवटच्या टप्प्यात पावसाने पाठ फिरविल्याने भाताची शेती विना पाण्याने करपून गेली. शेवटी हाती उरलेल्या गवताच्या खरेदीतही व्यापाराकडून लूट सुरू झाल्याने गवताला (पावलीला) योग्य भाव मिळावा या मागणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांसह अन्य सहभागी संघटनांनी पालघर तहसीलदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन करीत संपूर्ण रस्त्याची वाहतूक रोखून धरली.


दुधाचे उत्पन्न देणाºया गाई आणि अन्य पशूंना खाद्य म्हणून जिल्ह्यातील गवताला मोठी मागणी आहे. जून महिन्याच्या प्रारंभीच पावसाने चांगली सुरु वात केल्याने जिल्ह्यातील शेती चांगलीच बहरली होती. शेवटच्या टप्प्यात पावसाची गरज असताना अचानक पावसाने पाठ फिरविल्याने अनेक भागातील भात शेती करपून गेली. गुजरात राज्यात गवताला मोठी मागणी असून खरेदी करणारे व्यापारी प्रति किलो २ रु पये ४० पैसे ते ३ रु पये ६० पैसे असा नगण्य भाव देत असून व्यापाराकडून शेतकºयांची अक्षरश: लूट सुरू असल्याचे आंदोलन कर्त्याचे म्हणणे आहे.


चार रस्ता पालघर येथून माकप, अखिल भारतीय किसान सभा, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय आणि एसेफआय आदी संघटनांच्या शेकडो मोर्चेकºयांनी दुपारी १ वाजता आपल्या बैलगाडीवर पावल्यांचा ढीग रचून तहसीलदार कार्यालय गाठले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देत गवताच्या प्रति काट्यास (५०० किलो) ३००० रुपये दर द्यावा, शेतमजुरास प्रतिदिन ३२० रु पये पगार मिळावा, गठी (गवताचा भारा) भरणाºया कामगाराला प्रति गठी ५० रुपये मिळावे अशा मागण्या माकप चे तालुका सचिव कॉ. सुदाम धिंडा यांनी केल्या. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने आदिवासी शेतकºयां कडून बाजारभावा पेक्षा जादा दराने गवत खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यात शासनाला मोठा तोटा झाल्याने ही योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या गवत खरेदी- विक्र ीवर शासनाचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यामुळे या प्रकरणात कुठलाही निर्णय होत नसल्याने मोर्चे कºयांनी संध्याकाळ पर्यंत रस्त्यावर ठिय्या आंदोलन पुकारीत वाहतुक रोखून धरली.
 

गवत खरेदी बाबत शासनाचे कुठलेही धोरण नसल्याने त्यांच्या भावा संबंधित मागण्याची पूर्तता माझ्या पातळी वरून होणे शक्य नाही. परंतु गरीब शेतकºयांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी गवत खरेदी करणारे व्यापारी आणि आंदोलन कर्ते याच्यातील चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय.
-महेश सागर,
तहसीलदार, पालघर.

Web Title: Looted by traders in the purchase of grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.