डहाणूची महालक्ष्मी माता, लाखो भाविकांचे श्रध्दास्थान

By admin | Published: April 11, 2017 02:05 AM2017-04-11T02:05:47+5:302017-04-11T02:05:47+5:30

डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई- अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. ठाणे, पालघर जिल्हयातील भाविकांबरोबर गुजरात मधील भाविक

Mahalaxmi Mata of Dahanu, Lord of millions of devotees | डहाणूची महालक्ष्मी माता, लाखो भाविकांचे श्रध्दास्थान

डहाणूची महालक्ष्मी माता, लाखो भाविकांचे श्रध्दास्थान

Next

- शशिकांत ठाकूर, कासा

डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई- अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. ठाणे, पालघर जिल्हयातील भाविकांबरोबर गुजरात मधील भाविक येथे मोठया संख्येने यात्रा काळात दर्शनासाठी येतात. सुरतमधील भाविकांचीही या देवीवर श्रध्दा आहे. ११ एप्रिलपासून देवीची यात्रा सुरू होत असून सतत पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षेची जय्यत तयारी असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमूख यांनी दिली.
वर्षभरात या देवीचे बारसी, नवरात्र यात्रा आदि निरनिराळे उत्सव होतात. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून पंधरा दिवसाची यात्रा भरते हे येथील मुख्य आकर्षण असून यात्रेत ठाणे, पालघर जिल्हयातील ही सर्वात मोठी यात्रा आहे. या यात्रेदरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला होम व त्यानंतर अष्टमीला दुसरा होम असतो. देवीवर आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती आदी समाजाचे भाविक देवीला आपली कुलस्वामीनी मानतात. मंदिरात पुजारी हे आदिवासी समाजाचे व सातवी कुटुंबाचे आहेत. ते श्रध्देने देवीची पूजा करतात.
महालक्ष्मी मातेच्या अनेक अख्यायीका असून देवी डहाणूला स्थायीक कशी झाली याबाबत असे सांगितले जाते की, कोल्हापूरच्यामहालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली असता वाटेत विवळवेढे डोंगरादरम्यान जात असतांना विश्रांतीची गरज भासू लागली व विश्रांतीसाठी देवी मुसल्या डोंगराच्या शिखरावर गेली व पुढे देवीस भक्तांची आवश्यकता वाटली. येथील कान्हा ठाकूर नावाच्या व्यक्तीस देवीने स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला व पुजा करण्यास सांगितले. कान्हा ठाकूर मोठया श्रध्देने डोंगरावर जाऊन पूजा करू लागले. आणि पुढे देवी डहाणूला विवळवेढे येथे स्थायिक झाली असे महालक्ष्मी देवीच्या प्रसिध्द पुस्तकात नमूद केले आहे.


मध्यरात्री धावत जाऊन रोवला जातो ध्वज
चैत्र शुध्द पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री १२ वा. पुजारी ध्वज, पुजेचे साहित्य, नारळ घेऊन वेगाने पायथ्याच्या मंदिरापासून धावत निघतो व तीन मैलाच्या डोंगरदऱ्याचा रस्ता कापून मध्येरात्री ३ वा. डोेंगरावर चढतो व तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकावतो. ध्वज लावण्यास जातो त्यावेळी त्याच्या अंगात देवी संचारते असे म्हणतात. हे देवकार्य वाबाडी येथील मोरश्वर सातवी परंपरेने करतात.

Web Title: Mahalaxmi Mata of Dahanu, Lord of millions of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.