Maharashtra Election 2019: मतदान कमी झाल्याचा फटका कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 01:04 AM2019-10-23T01:04:01+5:302019-10-23T06:14:08+5:30

Maharashtra Election 2019: नालासोपाऱ्यात ४ टक्क्यांनी मतदान घटले

Maharashtra Election 2019: Voting is down Who is at a disadvantage? | Maharashtra Election 2019: मतदान कमी झाल्याचा फटका कोणाला?

Maharashtra Election 2019: मतदान कमी झाल्याचा फटका कोणाला?

Next

नालासोपारा : सेना आणि बविआमधील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीदरम्यान सोमवारी मतदान पार पडले. नालासोपाऱ्यातील १४ उमेदवारांच्या या लढतीमध्ये बविआचे क्षितिज ठाकूर आणि शिवसेनेचे प्रदीप शर्मा यांच्यातच मुख्य लढत आहे. दरम्यान, नालासोपाऱ्यात मतदानाचा टक्का यावेळी घसरल्याने या मतांचा फटका नक्की कोणाला बसणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

२०१४ मध्ये येथे ५६ टक्के मतदान झाले होते तर यंदा येथे ५१.८२ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे यंदा येथील मतदान हे ४ टक्क्यांनी कमी झाले आहे. मतदारसंघात माकप, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिल्याने येथे सर्वच पक्षकार्यकर्त्यांनी उमेदवार निवडून येण्यासाठी मेहनत घेतली. मात्र, भाजपमध्ये असलेल्या नाराजीचा फटका कोणाला बसणार, हे अद्याप स्पष्ट नाही.

स्ट्राँग रुमवर पोलिसांचा कडक पहारा

नालासोपारा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मतदान पेट्या पश्चिमेकडील श्रीप्रस्था परिसरातील वृंदावन गार्डनमध्ये मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. सोमवारी मतदान झाल्यानंतर मतपेट्या रात्री ३ वाजेपर्यंत सील केल्याचे कळते. याठिकाणी कोणीही जाऊ नये अथवा काहीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने जागता पहारा दिला आहे. याठिकाणी सीआयएसएफ चे तीन प्लाटून, नालासोपारा पोलिसांची टीम, गुजरात पोलिसांची टीम असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उमेदवारांना आता प्रतीक्षा निकालाची

कौल कुणाला : उमेदवारांची धाकधूक वाढली; जिल्ह्यात सर्वाधिक मतदान विक्रमगडमध्ये

विक्रमगड/जव्हार : सोमवारी मतदान झाले आणि आता अवघ्या एका दिवसावर निकाल आला असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदारांनी दिलेले मत इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून या मतपेट्या आता दोन दिवस पोलिस संरक्षणात स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या असून तेथे कडक पोलीस बंदोबस्त आहे.

मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, याची धास्ती उमेदवारांना आहे. विक्रमगडमध्ये १० उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजपचे डॉ. हेमंत सवरा आणि राष्ट्रवादीचे सुनील भुसारा यांचातच आहे. मतदान झाल्याने आता सध्या कुणाचे पारडे जड आणि कुणाला झुकते माप याची चर्चा नाक्या नाक्यावर रंगली आहे. तर पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान झाल्याचे आकडीवरुन दिसते.

च्तर सर्वाधिक ६९ टक्के मतदान हे विक्रमगडमध्ये झाले आहे. या मतदारसंघात २ लाख ६२ हजार मतदार आहेत.राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांचे जव्हार मोखाड्यात चांगले वर्चस्व असून येथून त्यांना लीड मिळण्याची चर्चा आहे, तर वाडा आणि विक्र मगड भाजपचा बालेकिल्ला असल्याने त्यांना तेथे लीड मिळू शकतो. त्यामुळे ही लढत पहिल्यापासूनच चुरशीची व अटीतटीची मानली जाते.

च्दर निवडणुकीत मतमोजणीवेळी जव्हार मोखाड्यातून भुसारा हे आघाडी घेत असले तरीही मतमोजणीच्यावेळी विक्रमगड - कंचाड गटातून भाजपची सरशी होत असल्याचे चित्र दर निवडणुकीत पहायला मिळते आहे. दरम्यान, मागील पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकीला जव्हार तालुक्यातुन महाआघाडीला आघाडी घेण्यात यश आले होते.

५आमचाच उमेदवार निवडून येणार, सोशल मीडियावर वॉर

२१ ऑक्टोबरला मतदान झाल्यापासूनच सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम, वॉट्सअप, ट्विटर यांच्यावर पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आमच्याच पक्षाचा उमेदवार निवडून येईल अशा आशयाचे मेसेज सुरू आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019: Voting is down Who is at a disadvantage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.