रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 06:18 AM2024-10-26T06:18:09+5:302024-10-26T06:19:20+5:30
रांगोळी स्पर्धेतूनही नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले
रवींद्र घरत, लोकमत न्यूज नेटवर्क, सफाळे: विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी सर्वच स्तरावर जनजागृती केली जात आहे. सफाळेत रांगोळी स्पर्धेतूनही नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.
राजगुरू ह.म. पंडित विद्यालय व निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालय सफाळे येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन गुरुवारी केले होते. उद्घाटक म्हणून बोईसरचे नोडल अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पालघर संजय वाघ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या.
मतदानाचा टक्का वाढविण्याचा उद्देश
- नागरिकांना मतदानासाठी प्रेरणा मिळावी व मतदानाचा टक्का वाढावा हा या रांगोळी स्पर्धेमागील उद्देश होता. रांगोळीत मतदाना संदर्भातील घोषवाक्ये लिहिली होती. प्रदर्शन राजगुरू विद्यालयातील ५ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी पाहिले. सर्व विद्यार्थ्यांना संजय वाघ यांनी मार्गदर्शन केले.
- यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख स्वाती पागधरे, प्राचार्य मधुमती कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका सुजाता घरत, राजेंद्र जायभाये, लीलाधर रायसिंग, जतिन कदम, मनीषा वैती, अक्षय सत्पाळकर, तझिन शेख यात सहभागी झाले होते.