विद्युल्लता पंडितांना महाराष्ट्र कन्या गौरव
By admin | Published: March 12, 2017 02:00 AM2017-03-12T02:00:27+5:302017-03-12T02:00:27+5:30
श्रमजीवी संघटना आणि विधायक संसदच्या माध्यमातून हजारो वेठबिगारांना माणूस म्हणून जगावला शिकविणाऱ्या विद्युल्लता पंडित यांना ‘महाराष्ट्र कन्या गौरव
पारोळ : श्रमजीवी संघटना आणि विधायक संसदच्या माध्यमातून हजारो वेठबिगारांना माणूस म्हणून जगावला शिकविणाऱ्या विद्युल्लता पंडित यांना ‘महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार-२०१७’ हा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
आयकॉन प्रतिष्ठान या संस्थेने समाजाच्या विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या १४ महिलांना जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारल्यानंर विद्युल्लता पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ . शशिकला वंजारी आणि प्राचार्य मानसी देशमुख यांचे हस्ते विधुल्लता पंडित यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, प्रख्यात चित्रपट व नाट्य अभिनेत्री सुहास जोशी, खाबिया समूहाचे चेअरमन किशोर खाबिया, आयकॉन प्रतिष्ठानचे संचालक मनोज वरंदळ, माजी आमदार विवेक पंडीत, तसेच श्रमजीवी संघटनेच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (वार्ताहर)