महाराष्ट्र मिशन १ मिलियन : पालघर जिल्हा बनला फुटबॉलमय, पालकमंत्री विष्णू सवरांच्या हस्ते शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 04:09 AM2017-09-17T04:09:21+5:302017-09-17T04:09:25+5:30
फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्र ीडा विभागाने राज्यात ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ हे फुटबॉल खेळाबाबत विद्यार्थी व तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून अभियान राबविले आहे.
पालघर/वाडा : फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्र ीडा विभागाने राज्यात ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ हे फुटबॉल खेळाबाबत विद्यार्थी व तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून अभियान राबविले आहे. या अंतर्गत शुक्र वारी राज्यभरातील १० लाख विद्यार्थी एकाच दिवशी फुटबॉल खेळणार आहेत. यात पालघर जिल्ह्यातील सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून त्याचा शुभारंभ राज्याचे आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरांच्या हस्ते वाड्यात करण्यात आले.
फुटबॉल खेळामध्ये सर्वाधिक महत्व असलेला फिफा वर्ल्डकप भारतात होत आहे. या खेळाविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून राज्यभर आज १० लाख विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. पालघर जिल्ह्यातील शेकडो शाळांमध्ये फुटबॉल खेळला गेल्याने संपूर्ण जिल्हा फुटबॉलमय बनला होता. या अभियानाच्या जिल्हास्तरावरील फुटबॉल खेळाचा शुभारंभ मंत्री हस्ते वाड्यातील पी. जे. हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, तालुका क्र ीडा अधिकारी शरद कलावंत, शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाराथे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड, श्रीकांत आंबवणे आदी उपस्थित होते.
यावेळी सवरा म्हणाले की, राज्यात आज लाखो विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. फुटबॉल सारख्या खेळाला जगात मान्यता आहे. या खेळावर जगभरातील लोक प्रचंड प्रेम करतात. या अभियानातून आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन फुटबॉलमध्ये करीयर केले तर आपल्या देशाला उद्योन्मूख खेळाडू मिळतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे यावेळी ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ फुटबॉल खेळ अंतर्गत घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मंत्री सवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्र ीडाशिक्षक भीमराव गवई, बी. के. पाटील यांच्या विशेष मेहनत घेतली.