ऐन दिवाळीत महावितरणचा लपंडाव, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 02:24 AM2017-10-15T02:24:51+5:302017-10-15T02:25:12+5:30

तालुक्याच्या परिसरातील विविध गावांमध्ये होणा-या भारनियमना व्यतिरीक्त विजेच्या लंपडावामुळे अगोदरने नागरिक त्रस्त झाले आहे.

Mahavitaran's hideout in Ain Diwali, civilians suffer | ऐन दिवाळीत महावितरणचा लपंडाव, नागरिक त्रस्त

ऐन दिवाळीत महावितरणचा लपंडाव, नागरिक त्रस्त

Next

विक्रमगड : तालुक्याच्या परिसरातील विविध गावांमध्ये होणा-या भारनियमना व्यतिरीक्त विजेच्या लंपडावामुळे अगोदरने नागरिक त्रस्त झाले आहे. त्यातच गेल्या आठवडाभरा पासुन दिवसभर लाईट गुल होत असल्यामुळे गावकºयांचे तसेच विजेवर अवलंबुन असणाºया व्यवसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गेले काही दिवस रोज दिवसभर वीज गुल होत असल्याने दिवाळीचा फराळ करतांना महिलांना सुद्धा मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दिवसा कामाच्या वेळी वीज नसणे तसेच रात्री अपरात्री ती गुल होणे या प्रकारामुळे अनेकांना सध्या झोपमोडीचा त्रास होत आहे. दिवाळीच्याकाळात खरेदीसाठी बाजार गर्दी असते मात्र विजे आभावी व्यावसायिकांना खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये वादळी वाºयासह पाऊस सुरु असतो. त्यातच वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी अनेक विजेचे पोल वाकले असून वाहिन्याही तुटल्या आहेत. हा परिसर दुर्गम व जंगलपट्टीचा असल्याने महावितरणलाही तो सुरळीत करतांना मोठी मशक्कत करावी लागत आहे.
विक्रमगड पंचायत समितीने पावसाळ्या आगोदर चांगली साफ सफाई न केल्याने डासांचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच वीज नसल्याने सायंकाळी व रात्री त्यांचा मोठा त्रास होत आहे. यामुळे अनेकांना हिवतापाची बांधा झाल्याचे ही दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या असल्या तरी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप व्यत्यय आल्याचे पालकांनी लोकमत केडे बोलून दाखविले.
विक्र मगड तालुक्यावर महावितरण इतर तालुक्याच्या मानाने अन्याय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. तालुक्याला सध्या विजेच्या प्रश्नाने पुर्ते ग्रासले आहे. चोवीस तासापैकी काही तास वीज उपलब्ध होत असते. त्यातही सातत्य नसल्याने त्याचा दिवसा फारसा उपयोग नाही. त्यामुळे महावितणाच्या विजे संबंधीत असलेल्या या गाफिल कामाविषयी नागरिकांमधुन नाराजीचा सुर उमटत आहे.
अनेक मीटर धारकांना अधिकचे बील आकारणी हा प्रश्न जुनाच असून विजेचा लंपडाव आधिची डोकेदुखी वाढवणारी आहे. विजेवर चालणारी उपकरणे बंदच असतात. किंवा कमी दाबाच्या प्रवाहामुळे ती चालत नाहीत. विजेचा वापर होत नसतांनाही महावितरणाकन ग्राहकांकडून वीजबील वसुली करीत आहे. विज बीले वेळेवर भरली नाहीत तर पुरवठा खंडीत केला जात आहे.

कामाच्या वेळेत वीज नसते महावितरणचे बिल मात्र मोठे असते
आज विक्र मगडमध्ये वीज पहाणेच दुर्लभ झाले आहे. कारण ज्यावेळेस विजेची आवश्यकता असेते तेव्हा ती नसते त्यामुळे येणारे बील कशाचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वीज वापरापेक्षा येणाºया प्रचंड बिलामुळे नागरिक संतप्त झाले आहे. अनेकवेळा पुरवठा खंडीत होतो. याचा फटका विजेवर आधारीत व्यवसायीकांना होत असून विक्र मगड तालुक्यातील झेरॉक्स, कम्प्युटर, दुकानदार संताप व्यक्त करीत आहेत.
छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यवसायिक आहेत. या विजेच्या समस्येमुळे या व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याने काही बाहेरील व्यवसायिक दुसरे शहरांकडे स्थलातरीत झाले आहेत. त्यामुळे महावितरणाने इतर तालुक्याप्रमाणे विक्र मगड तालुक्याकडे गांभीर्याने पाहुन विजेची समस्या सोडवावी व विज ग्राहकांना दिलासा दयावा अशी एकमुखी मागणी होत आहे.

Web Title: Mahavitaran's hideout in Ain Diwali, civilians suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.