वसईतील 16 गावांमध्ये महिलाराज, तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 01:48 AM2021-02-03T01:48:12+5:302021-02-03T01:49:41+5:30

Sarpanch : वसई तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून गावाचा कारभार कोण सांभाळणार, हे आता उघड झाले आहे.

Mahilaraj in 16 villages of Vasai, reservation for Sarpanch post in the taluka announced | वसईतील 16 गावांमध्ये महिलाराज, तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

वसईतील 16 गावांमध्ये महिलाराज, तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

googlenewsNext

- सुनील घरत
पारोळ : वसई तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून गावाचा कारभार कोण सांभाळणार, हे आता उघड झाले आहे. वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी तहसीलदार कार्यालयात वसईतील ३१ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर केली असून यामध्ये १६ गावचा कारभार महिला पाहणार आहेत, तर १५ गावच्या सरपंचांची धुरा पुरुष सांभाळणार आहेत. तालुक्यात या वर्षीची पहिली ग्रामपंचायत निवडणूक सत्पाळा व पाली या दोन गावांत झाली. या गावांत सरपंचपदासाठी कोणते आरक्षण पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्पाळा ही ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली असून पालीमध्ये सर्वसाधारण पुरुष गावचा कारभार पाहणार आहे.

तालुक्यात या वर्षी जूनमध्ये काही ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यामुळे काही महिन्यात या गावात निवडणुका होण्याची शक्यता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक या वर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आली, तर कोरोनाचा कहर कमी झाल्याने पुढे येणाऱ्या निवडणुका या वेळेत होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या वर्षी भरउन्हाळ्यात गावांतील राजकीय वातावरण तापणार आहे. दरम्यान, नोव्हेंबरमध्येसुद्धा ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले होते, पण निवडणुकीच्या आधी आरक्षण जाहीर झाल्यास निवडणुकीत सरपंचपदासाठी घोडेबाजार होईल म्हणून सरकारने आरक्षण रद्द केले होते. आताही पुढे निवडणूक होणाऱ्या गावांचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने येणाऱ्या निवडणुकीतही या आरक्षणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सत्पाळा अनुसूचित महिला, तर पालीत पुरुष सरपंच
नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या दोन ग्रामपंचायतींपैकी सत्पाळा ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाली आहे. यामुळे निवडून आलेल्या अनुसूचित जमातीच्या महिलांपैकी सरपंचपदाची लाॅटरी कुणाला लागते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. तर पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणात सर्वसाधारण पुरुषांना आरक्षण पडले आहे. त्यामुळे निवडून आलेल्या पुरुष उमेदवारांपैकी कोण गावचा कारभारी होतो, याकडे लक्ष लागले आहे. 

अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण
३१ पैकी १९ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या असून या गटातील महिलांसाठी मेढे, माजिवली-देपिवली, आडणे-भिनार, पारोळ, करंजोण, नागले, शिवणसई, उसगाव, सायवन या गावांचा, तर अनुसूचित पुरुषांसाठी सकवार, टिवरी, चंद्रपाडा, टोकरे, मालजीपाडा, तिल्हेर, पोमण, शिरवली आणि खानिवडे, भाताणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

८ ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी राखीव
अन्य १२ ग्रामपंचायतीत सत्पाळा अनु. जमाती महिलांसाठी राखीव, अर्नाळा गाव नागरिकांच्या मागास प्रवर्ग पुरुषांसाठी, तरखड, पाणजू ग्रा.प. महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. इतर ८ ग्रा.पं. या सर्वसाधारण वर्गासाठी राखीव कळंभ, खोचिवडे, अर्नाळा किल्ला व रानगाव, सर्वसाधारण महिलांसाठी वासळई, पाली, टेंभी,खार्डी-डोलीव सर्वसाधारण पुरुषांसाठी राखीव झाल्या आहेत.
 

Web Title: Mahilaraj in 16 villages of Vasai, reservation for Sarpanch post in the taluka announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.