मित्र वाचवतोय १८ वर्षे सर्पांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:21 AM2017-07-29T01:21:04+5:302017-07-29T01:21:07+5:30

सर्प दिसताच अनेकाची बोबडी वळते. सर्प दिसताच त्याला पकडण्यासाठी दीक्षित सराना फोन करा असे शब्द अनेकांच्या तोंडून निघतात हा सर्प वेडा सर्पमित्र त्या ठिकाणी तत्काळ त्या ठिकाणी हजर.

maitara-vaacavataoya-18-varasae-sarapaannaa | मित्र वाचवतोय १८ वर्षे सर्पांना

मित्र वाचवतोय १८ वर्षे सर्पांना

Next

राहुल वाडेकर 

विक्रमगड : सर्प दिसताच अनेकाची बोबडी वळते. सर्प दिसताच त्याला पकडण्यासाठी दीक्षित सराना फोन करा असे शब्द अनेकांच्या तोंडून निघतात हा सर्प वेडा सर्पमित्र त्या ठिकाणी तत्काळ त्या ठिकाणी हजर. आणि अंगावर शहारे आणारा थरार सुरु होतो. एखादे फूलपाखरू पकडावे. तसे अलगद सापाला पकडून ज्याच्या घरी किवा शेतात सर्प होता.त्यांना घेऊन जंगलात त्या पकडलेल्या सापाला सोडून परत तो आपल्या घरी येतो. स्वताच्या स्वखर्चाने केवल समाजकार्य म्हणून सापाला जीवदान, पर्यायाने माणसाला जीवदान व सापा विषयी समाजप्रबोधन अशा तिहेरी भूमिकेत विक्रमगड येथील सर्प मित्र पेशेन शिक्षक असलेला गोपाळ दीक्षित सर.. गेल्या १८ वर्षा पासून आखंड पने कार्य करत आहेत. आता पर्यत त्यानी १३०० सापाना जीवदान दिले आहे.. सापांविषयी असलेल्या गैरसमजामुळे साप दिसल्यावर त्याला मारण्यात येते. वास्तविक, साप हा पर्यावरणाच्या जीवनचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. सरपमित्र गोपाळ अरूण दीक्षित सर विक्र मगड हायस्कूल येथे १९९७ पासून कार्यरत आहे. गेली १८ वर्षापासून विक्रमगडमध्ये सर्पमित्र म्हणून कार्यरत.या कार्याची दखल घेऊन वनविभाग महाराष्ट्र शासनाकडून सर्पमित्र म्हणून ओळखपत्र मिळालेले विक्रमगड तालुक्यातील पहले सर्पमित्र आहेत.
अनेक संस्थाच्या मदतीने पर्यावरण विषयक जनजागृतीमध्ये सहभाग त्यानी घेतला आहे. विक्र मगड, वाडा, जव्हार, मोखाडा परिसरात येथे वनविभागाच्या सहाय्याने वन्यजीव संवर्धनामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. आतापर्यंत त्यानी १३०० सर्प पकडून त्यांना वनांत सोडले आहे. वास्तविक, साप दूध पीत नाही. सापाची शरीररचना मांसाहारी असल्याने तो दगावतो. असे असतानाही त्याला दूध पाजण्याचा अट्टाहास केला जातो. शेतीसाठी उपद्रवी ठरणाº्या उंदरांना साप खातो. त्यामुळे अन्नधान्याचे नुकसान होत नाही. भारतात सापाच्या २६३ जाती आहेत. यापैकी काही बिनविषारी, विषारी व काही सौम्य विषारी आहेत. मात्र, बिनविषारी सापांचे प्रमाण जास्त आहे.
यात नाग, मण्यार, घोणस, फुरसे, रातसर्प, पोवळा व समुद्रसाप हे विषारी आहेत. मांजºया, हरणटोळ, रेतीसर्प आदी सौम्य विषारी व धामण, मांडूळ, कवड्या, गवत्या, धूळनागीण, पाणदिवड्या, चित्रांक, नायकूळ व डुरक्या इत्यादी बिनविषारी साप आहेत. पालघर व ठाणे जिल्ह्यात अनेक प्रकारचे साप आढळतात. अशी माहिती विक्रमगड येथील सर्प मित्र गोपाल दीक्षित यानी दिली. त्याच प्रमाणे नागपंचिमला त्यानी विक्र मगड, जव्हार परीसरातील खेडो-पाडी विषारी बिनविषारी सर्पांबद्दल जनजागृती करून ते वाचविण्याचा संकल्प प्रत्येकाने नागपंचमीला करावा, असे आवाहन विक्रमगड येथील सर्पमित्र गोपाळ दीक्षित (सर) यानी केले आहे.

Web Title: maitara-vaacavataoya-18-varasae-sarapaannaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.