मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार आणि भारोळ येथे सूर्याच्या जलवाहिनीला मोठी गळती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 06:33 PM2022-03-22T18:33:18+5:302022-03-22T18:33:57+5:30

सूर्या धरणाच्या जुन्या योजनेतील जलवाहिनीला  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार व भारोळ गावाजवळ सोमवार (दि.२१) रोजी  मोठी गळती झाल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाने लोकमत ला दिली आहे.

Major leakage of solar water at Sakwar and Bharol on Mumbai-Ahmedabad National Highway | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार आणि भारोळ येथे सूर्याच्या जलवाहिनीला मोठी गळती

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार आणि भारोळ येथे सूर्याच्या जलवाहिनीला मोठी गळती

Next

- आशिष राणे
वसई  - वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेतील जलवाहिनीला  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार व भारोळ गावाजवळ सोमवार (दि.२१) रोजी  मोठी गळती झाल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाने लोकमत ला दिली आहे.
दरम्यान पाणीपुरवठा नियंत्रक अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी महामार्गावर गळती सुरू झाल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या फिरत्या गस्ती पथकास  माहिती मिळाली होती मात्र त्याच ठिकाणी बडोदा एक्स्प्रेसचे ही काम हाती घेण्यासाठी महावितरण कंपनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागास आगाऊ  पत्र दिले होते त्यामुळे दोन्ही विभागासाठी एकाचवेळी दुरुस्तीचे काम हाती घेतल्यास  पुन्हा दुसऱ्या वेळी पाणी पुरवठा व विजखंडीत करावी लागणार नाही असे सबळ कारण देत अखेरीस दोघा च्या सोयीनुसार वसई विरार महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर या जलवाहिनी दुरुस्तीचे काम बुधवारी हाती हाती घेतल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान बुधवार दि २३ मार्च रोजी सकाळी ०९  वाजता हे दुरुस्ती चे काम  चालू करण्यात येणार असून या मोठया दुरुस्ती साठी अंदाजे पुढील १२  तास लागणार असल्याची शक्यता वर्तवली आहे आणि त्याच वेळेस मासवण महावितरण कं. मार्फत मुंबई-बडोदा दुत गती महामार्गच्या मार्गिकेमध्ये आड येणारी उच्च दाबाची विद्युत वहिनी देखील  स्थलांतरित करण्याचे नियोजन असल्याने या संपूर्ण कामासाठी साधरण ९  तासांचा  कालावधी अपेक्षित आहे. परिणामी  बुधवार दि २३ मार्च रोजी सकाळी ०९ ते रात्री ०९  हया १२ तासाच्या दरम्यान सूर्या धरणातून होणारा पाणी पुरवठा पुर्ण पणे बंद राहील असे ही महापालिका पाणीपुरवठा विभागाने कळवले असून तद्नंतर बुधवारी रात्री व  गुरुवारी दिवसभरात टप्याटप्याने शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल त्यामुळे शहरांतील  नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे असे ही आवाहन वसई विरार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. 

Web Title: Major leakage of solar water at Sakwar and Bharol on Mumbai-Ahmedabad National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.