सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा स्वत:चे आयुष्य चांगले घडवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 11:34 PM2019-08-02T23:34:32+5:302019-08-02T23:34:35+5:30
चिराग कोटडिया : वसईत ‘जिंदगी की बुनियाद’ विषयावर व्याख्यान
वसई : विद्यार्थ्यांनी वाईट सवयी बदलून जाणीवपूर्वक चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. मोबाइलचा अतिवापर टाळा असे सांगून टीव्ही तसेच सोशल मीडियावर आपला वेळ वाया न घालवता तोच वेळ स्वत:चे आयुष्य बदलण्यासाठी सत्कारणी लावा. आणि सर्वांशी उत्तम सुसंवाद ठेवताना आई वडिलांनाही वेळ द्या, तेच तुमचे उत्तम मार्गदर्शक असल्याचे चिराग कोटडिया यांनी सांगितले.
संत गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे गुरुवारी ‘जिंदगी की बुनियाद’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते चिराग कोटिडया यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. आयुष्यात सकारात्मकतेला फार महत्त्व आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते, उप-प्राचार्य प्रा.जोस जॉर्ज, हिंदी साहित्य मंडळ अध्यक्ष किमया घरत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ.रामदास तोंडे यांनी करीत दीपप्रज्वलन व स्वागत गीताने कार्यक्र माची सुरु वात झाली. यावेळी हिंदी साहित्य मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ.रामदास तोंडे यांनी केले तर शेवटी आभार दीपिका घुसेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्र मासाठी कॉलेजमधील विविध विभागाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग्य नियोजन हवे
च्विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मकता बाळगावी. नियोजन आणि कठोर परिश्रमाने जीवनात नक्कीच यश मिळते, असेही चिराग यांनी विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना पटवून दिले. यामुळे तुमचे आयुष्य घडवायला तुम्हाला निश्चित मदत होईल असेही ते म्हणाले.