मकोक्याच्या आरोपीला मुंबईतून शिताफीने केली अटक; गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 04:41 PM2023-08-19T16:41:00+5:302023-08-19T16:41:11+5:30
बांधकाम विकासकावर तलावारीने जीवघेणा हल्ला करुन खंडणी मागणाऱ्या व मकोकाच्या आरोपीला मुंबईच्या गोरेगाव येथून शिताफीने अटक केले आहे.
(मंगेश कराळे)
नालासोपारा : बांधकाम विकासकावर तलावारीने जीवघेणा हल्ला करुन खंडणी मागणाऱ्या व मकोकाच्या आरोपीला मुंबईच्या गोरेगाव येथून शिताफीने अटक केले आहे. पोलीस आयुक्तालय, मुंबई आणि ठाणे परिसरात गुन्हे दाखल असलेल्या या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
मीरा रोड येथील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र रमाकांत यादव (५०) हे जुचंद्रच्या बिंधशक्ती रियल इस्टेट अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कार्यालयात २० जूनला बसले असताना आरोपी गिरीश नायर दोन जणांना सोबत येऊन एक कोटी खंडणीची मागणी करत धमकावले होते. त्यानंतर पुन्हा २१ जूनला गिरीशने आपल्या सोबत दहा आरोपींना घेऊन कार्यालयातील सामानाची मोडतोड करत जितेंद्र यांच्यावर डोक्यात व पायावर तलवारीने प्राण घातक वार करत खंडणी दिली नाही तर ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली होती. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी हत्यार बंदी कायदा व खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.
सदर दाखल गुन्ह्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेऊन गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन अटक करण्यासाठी विविध पथके नेमण्यात आली होती. आरोपींचा पुर्व गुन्हेगारी इतिहास व दाखल गुन्हयाचे स्वरुप लक्षात घेऊन या गुन्हयातील अटक आरोपी विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंञण अधिनियम (मकोका) लावण्यात आला आहे. या गुन्हयातील पाहिजे आरोपी गिरीष कुमारन नायर हा गुन्हा दाखल झाल्यापासून आपले अस्तित्व लपवुन वास्तव्य करीत होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे व मिळालेल्या खाञीशाीर माहीतीच्या आधारे गिरीष नायर (३८) याला गोरेगाव येथुन शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले- श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे व अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, नायगाव पोलीस ठाण्याचे संयुक्त पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, चेतन ठाकरे, सचिन खाताळ, जैवंत खांडवी, अमर पवार, सचिन मोहीते यांनी केली आहे.