कुपोषणाचा विळखा पुन्हा घट्ट, आॅगस्ट २०१७ ची धक्कादायक आकडेवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:28 AM2017-10-03T00:28:31+5:302017-10-03T00:28:35+5:30
पुर्वी च्या ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा, डहाणू, तलासरी आदी आदिवासी गाव-पाड्यातील बालकांना लागलेली कुपोषणाची वाळवी पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मिती नंतरही कायम आहे.
रवींद्र साळवे
मोखाडा : पुर्वी च्या ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्र मगड, वाडा, डहाणू, तलासरी आदी आदिवासी गाव-पाड्यातील बालकांना लागलेली कुपोषणाची वाळवी पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मिती नंतरही कायम आहे.
सद्यस्थितीत पालघर जिल्हात तालुकानिहाय तलासरी २४८, जव्हार १ - १५१, जव्हार २- १९१, विक्र मगड ३०८, मोखाडा २२९, डहाणू ४०८, कासा २३१, वाडा १ - १३९, वाडा २ - २७१, पालघर ३५४, मनो २६२, वसई १ - २०५, वसई २ - १८४ अशा एकुण ३,१८१ इतक्या अंगणवाड्या आहेत. या केंद्रातील जुलै २०१७ च्या अखेरीस ग्राम बाल विकास केंद्राच्या ङ्कअहवाला नुसार प्राप्त झालेल्या कुपोषित बालकांच्या यादी नुसार सॅम म्हणजेच (तिव्र कुपोषित बालके) तालुका निहाय डहाणू १५६, तलासरी १८, मोखाडा ४१, जव्हार १४१, विक्रमगड १२८, वाडा १०१, पालघर ३८, वसई ३२ या प्रमाणे जिल्हा भरात एकुण ६५५ तिव्र कुपोषित बालके आहेत. तसेच मॅम या मध्यम कुपोषित बालकांच्या श्रेणीमध्ये डहाणू ३८४, तलासरी ३२८, मोखाडा २६४, जव्हार ८४७, विक्र मगड ७३८, वाडा ५२५, पालघर ३८१, वसई १५४ या प्रमाणे जिल्हा भरात एकुण ३,६२१ मध्यम कुपोषित बालके आहेत. तर तिव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची जिल्हातील एकूण आकडेवारी बघता ४,२७६ एवढी आहे.
त्याचप्रमाणे आॅगस्ट महिन्यामध्ये २,६०३ एवढी कुपोषित बालके असून यातील ५११ बालके आज ही तिव्र कुपोषित म्हणजेच सॅम श्रेणीत आहेत तर २०९२ बालके मध्यम कुपोषित म्हणजेच मॅम श्रेणीत आहेत. विशेष म्हणजे जिल्हातील ० ते ६ वयोगटातील बालकांचा कुपोषित, भुकबळी आदी विविध कारणामुळे झालेल्या बालमृत्यूचे प्रमाण देखील अधिक असून एप्रिल २०१७ ते आॅगस्ट २०१७ अखेर पर्यत डहाणू तालुक्यात ५४, जव्हार ४४, विक्रमगड १९, मोखाडा ११, पालघर ३२, तलासरी १६, वाडा १३, वसई १५ या प्रमाणे जिल्हा भरात एकुण २०४ कुपोषीत बालके भुकबळी आदी विविध कारणामुळे दगावली आहेत.
महत्वाचे म्हणजे ११ सप्टेंबर २०१७ रोजी अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपा दरम्यान अंगणवाडी केंद्र वा बालकांचा सकस आहार बंद असल्याने तसेच शासनाच्या तोकड्या सकस आहार देण्याच्या कार्यकाळात पालघर जिल्हात ११ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या १४ दिवसाच्या कालावधीत ० ते १ वयोगटातील १० कुपोषितांचा तर १ ते ६ वयोगटातील ५ कुपोषित बालकांचा मृत्यू म्हणजे एकंदर १५ बालकांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे जिल्हा भरातील आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी राबविण्यात येणाºया योजना अथवा यंत्रणा किती सक्षम आहेत हे यावरु ण कळते.