मालवणी जत्रोत्सवातून रोजगार

By admin | Published: December 25, 2016 12:13 AM2016-12-25T00:13:36+5:302016-12-25T00:13:36+5:30

मालवणी जत्रौेत्सवातून तरुणांसह ,महिलांना एक रोजगाराचे केंद्र उपलब्ध होत आहे. याची सुरुवात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करून कोकणवासीयांना

Malvani Jatotsav service | मालवणी जत्रोत्सवातून रोजगार

मालवणी जत्रोत्सवातून रोजगार

Next

वसई : मालवणी जत्रौेत्सवातून तरुणांसह ,महिलांना एक रोजगाराचे केंद्र उपलब्ध होत आहे. याची सुरुवात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करून कोकणवासीयांना व्यावसायिक प्रोत्साहन देण्याचे काम केले.जास्तीत जास्त तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी वसईत केले.
वसई पश्चिमेकडील मालवणी जत्रौत्सव व बालनगरीचे उदघाटन सेनेचे उपनेते अनंत तरे यांच्या हस्ते करण्यात आले नवघर माणिकपूर शहर व साईनगर शाखेच्या सहकार्याने वसईत मालवणी जत्रौत्सवाचे करण्यात आले आहे. उदघाटन प्रसंगी सेनेचे उपनेते अनंत तरे यांच्यासह वसई तालुका प्रमुख तेंडोलकर, नगरसेवक स्वप्नील बांदेकर, नगरसेविका किरण चेंदवणकर, प्रीती म्हात्रे, शिल्पा सिंग, माजी विरोधी पक्ष नेता विनायक निकम, उपतालुकाप्रमुख अतुल पाटील, नालासोपारा शहरप्रमुख जितेंद्र शिंदे, उपजिल्हा महिला संघटक प्राची फणसे, नवघर माणिकपूर शहरप्रमुख राजाराम बाबर ,वसई विधानसभा संघटक श्याम शिरोडकर , उपजिल्हाप्रमुख विवेक पाटील,विभागप्रमुख शशीभूषण शर्मा उपस्थित होते.
यावेळी प्रकाश जाधव यांनी कोकणी पद्धतीने गाऱ्हाणे घातले. याठिकाणी एकूण ५० दुकाने लावण्यात आली असून खास मालवणी पद्धतीचे पदार्थ ठेवण्यात आले असून महिला बचत गटांना याठिकाणी प्राधान्य देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Malvani Jatotsav service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.