पालघरमधील शुक्ला कंपाउंडमध्ये असलेल्या अडड्यावर धाड, ६ जुगारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 03:45 AM2017-08-27T03:45:37+5:302017-08-27T03:45:40+5:30
पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या शुक्ला कंपाउंडमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ६ जुगाºयांना अटक केली आहे. तर ९ जुगारी फरारी झाले.
पालघर : पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या शुक्ला कंपाउंडमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ६ जुगाºयांना अटक केली आहे. तर ९ जुगारी फरारी झाले.
पालघर रेल्वे स्टेशनच्या समोरील शुक्ला कंपाउंडमध्ये पोलिसांच्या आशीर्वादाने अनेक वर्षांपासून राकेश दीक्षित हा मोठा जुगाराचा अड्डा चालवित असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी निमिल गोहेल यांना मिळाली होती. येथून मोठा हप्ता बाहेर पाठविला जात असल्याने व काही पोलीस ही या जुगारात सहभागी होत असल्याने त्यावर कारवाई होत नव्हती . गणपती उत्सवाच्या पूर्वसंध्येला काही जण शुक्ला कंपाऊंडमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारीई गोहेल यांना मिळाली. त्यांनी पालघरमधील पोलीसाना धाडीबाबत कुठलीही कल्पना न देता नवीन नियुक्त झालेल्या पोलिसांची साथ घेऊन बुधवारी रात्री ९ वाजता ही धाड घातली गेली. त्यात जुगार खेळत असलेले विशाल किशोर भानुशाली (कमलापार्क), विनोद कांतीलाल भानुशाली(धडा हॉस्पिटल मागे), राजेंद्र बाबूराव पाटील (गोठणपुर), सुरेश अमरनाथ सरोज(डुंगी पाडा), सईद सपूर शेख (गांधी नगर),नरेश रजपूत(गणेश कुंडा जवळ), अशा ६ जुगाºयांना अटक करण्यात आली. अन्य ९ जुगारी पळून गेले. या घटनास्थळी एक पोलीस ही जुगार खेळत असल्याची चर्चा असून पालघरमध्ये अनेक वर्षे नोकरी करून वसई तालुक्यात बदली वर गेलेले काही पोलीस या जुगाराच्या हप्त्यातील वाट्याची मागणी आजही करीत असल्याचे एकाने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले. या कारवाई दरम्यान काही महिलांनी पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केल्याचे कळते.
रेल्वे स्टेशन समोरच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोरच बिनिदक्कतपणे एवढं मोठा जुगाराचा अड्डा सुरु असतांना आजपर्यंत त्यावर कारवाई करण्याचे धाडस कोणाही अधिकाºयाने केलेले नव्हते. मात्र कडक शिस्तीचे आणि नेहमी कायद्याचा वचक राहिला पाहिजे या भावनेतून काम करणारे उपविभागीय अधिकारी गोहेल ह्यांनी मात्र पूर्ण तयारीनिशी या अड्ड्यावर धाड घालून व जुगार प्रतिबंधक अधिनियमा द्वारे कारवाई करून ९ जुगाºयाना अटक केली आहे.
घटनास्थळावरुन १५ मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यातील संभाषणाद्वारे फरारी ९ जुगाºयांचा छडा लागणार आहे. त्यामध्ये चांगल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत. न्यायालयाने ६ आरोपीची जामिनावर सुटका केली असून पुढील तपास एस. एन. भोईर हे करीत आहेत.