धक्कादायक! रेल्वेखाली पत्नीला ढकलून, दोन मुलांसह तो पळाला; वसई रेल्वे स्थानकातील थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 05:54 AM2022-08-23T05:54:42+5:302022-08-23T05:55:06+5:30

दोन लहान मुलांसह रेल्वेच्या प्लॅटफाॅर्मवर गाढ झोपलेल्या पत्नीला उठवून एकाने थेट भरधाव एक्स्प्रेसखाली ढकलून दिले.

Man wakes up wife pushes her in front of train at Vasai station flees with two kids | धक्कादायक! रेल्वेखाली पत्नीला ढकलून, दोन मुलांसह तो पळाला; वसई रेल्वे स्थानकातील थरारक घटना

धक्कादायक! रेल्वेखाली पत्नीला ढकलून, दोन मुलांसह तो पळाला; वसई रेल्वे स्थानकातील थरारक घटना

Next

नालासोपारा :

दोन लहान मुलांसह रेल्वेच्या प्लॅटफाॅर्मवर गाढ झोपलेल्या पत्नीला उठवून एकाने थेट भरधाव एक्स्प्रेसखाली ढकलून दिले. वसई रोड रेल्वे स्थानकात सोमवारी पहाटे ही थरारक घटना घडली. अंगावर शहारे आणणारा हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर 
आरोपीने आपल्या दोन लहान मुलांसह घटनास्थळावरून पळ काढला. वसई लोहमार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

रविवारी रात्री एक जोडपे आपल्या दोन लहान मुलांसह प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर झोपले होते. सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान अवध एक्स्प्रेस येण्याअगोदर झोपलेल्या पत्नीला एकाने उठविले व एक्स्प्रेस स्थानकात येताच त्याने तिला रुळांवर ढकलून दिले. त्यानंतर आरोपी पती दोन्ही लहान मुलांना 
घेऊन पळून गेला. एक्स्प्रेसच्या लोको पायलटचा जबाब नोंदविण्यात आला आहे. आरोपी लोकलने दादर व तेथून कल्याणपर्यंत गेल्याचे निदर्शनास आले आहे.  

ही घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप महिलेची ओळख पटली नसून फरार आरोपीचा शोध घेत आहोत. 
- गणपत तुंबडा, पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे

Web Title: Man wakes up wife pushes her in front of train at Vasai station flees with two kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.