सुरत येथील कुस्ती स्पर्धेत मनाली जाधव ठरली अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 02:50 AM2019-02-05T02:50:53+5:302019-02-05T02:51:15+5:30

जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी, झडपोलीची आयकॉन खेळाडू मनाली जाधव हिने वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्या पाठोपाठच गुजरात येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत रौप्य पदक मिळवून भारतीय संघातील मधील आपले स्थान पक्के केले.

Manali Jadhav became the wrestling champion in Surat | सुरत येथील कुस्ती स्पर्धेत मनाली जाधव ठरली अजिंक्य

सुरत येथील कुस्ती स्पर्धेत मनाली जाधव ठरली अजिंक्य

googlenewsNext

पालघर : जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी, झडपोलीची आयकॉन खेळाडू मनाली जाधव हिने वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्या पाठोपाठच गुजरात येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत रौप्य पदक मिळवून भारतीय संघातील मधील आपले स्थान पक्के केले.

भिवंडीच्या दुगाड फाटा येथील शालेय जीवना पासून खेळात तरबेज असलेली मनाली जाधव ही २१ वर्षीय तरुणी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा गाजवीत असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली मोहर उठविण्यासाठी ती आता उत्सुक आहे. यवतमाळ येथील ६७ किलोच्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावून एका गरीब क्रीडापटूतही गुणवत्ता ठासून भरल्याचे तिने दाखवून दिले. आई-वडिलांचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवसरात्र स्वत:ला सरावात झोकून देत होती. मात्र एका स्पर्धेत झालेल्या अपघाताने तिचे हे स्वप्न उद्धवस्त होण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली. तिच्या पायाला झालेल्या गंभीर जखमेवर वेळीच उपचार न झाल्यास आपण कधीही कुस्ती खेळू शकणार नसल्याचे कळल्यावर ती नाउमेद झाली. एका साध्या पतपेढीत नोकरीला असणाऱ्या आईला एवढा खर्च पेलवणे शक्य नव्हते, अशावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष निलेश सांबरे ह्यांनी तिला मदतीचा हात देऊन तिचा शास्त्रक्रियेसह स्पर्धांचा व आहाराचा सर्व खर्च उचलला. आज तिच्या सोबत तिची छोटी बहीण गौरी जाधव ही कुस्तीपटूही जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी ला जोडली गेली असून ३० जानेवारी रोजी वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात खेळतांना मनाली हिने विजेतेपद पटकाविले. तर ६५ किलो वजनी गटात मनाली ची छोटी बहीण गौरी हिने उपविजेतेपद मिळविले. आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने इंडिया नॅशनल कॅम्प मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विविध भागांतील मल्ल जिवापाड मेहनत घेत असतात. मनाली हिने सुरत येथे २ फेब्रुवारी रोजी झालेल्या महिला ज्युनिअर नॅशनल कुस्ती स्पर्धेतील अंतिम सामन्यात रौप्य पदक मिळवून नॅशनल कॅम्प मध्ये प्रवेश मिळविल्याचे तिचे प्रशिक्षक ज्ञानेश्वर पाटील ह्यांनी लोकमतला सांगितले.

तिच्यात असलेल्या उपजत गुणांमुळे मनाली देशाला आंतरराष्ट्रीय पदक मिळवून देऊ शकते हा विश्वास जाणवला.त्यामुळे तिला भविष्यात कसलीही कमी पडू देणार नाही.
-निलेश सांबरे,
अध्यक्ष-जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, झडपोली.

Web Title: Manali Jadhav became the wrestling champion in Surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.