डहाणूतील बाजारात चेन्नईतील आंबा
By admin | Published: February 22, 2017 05:53 AM2017-02-22T05:53:19+5:302017-02-22T05:53:19+5:30
डहाणू तालुक्यातील फळबाजारात चेन्नई येथील आंबा दाखल झाला असून प्रतीकिलो ८० ते १२० रु पयांच्या दराने
अनिरु द्ध पाटील / डहाणू
डहाणू तालुक्यातील फळबाजारात चेन्नई येथील आंबा दाखल झाला असून प्रतीकिलो ८० ते १२० रु पयांच्या दराने त्याची विक्र ी केली जात आहे. दरम्यान उशिरा तसेच तीन टप्प्यात आंब्याचा मोहर आल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक आंबा बाजारात येईल असे स्थानिक बागायतदारांनी सांगितले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आंब्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येथे पिकलेला आंबा दाखल झाला आहे. त्यानंतर फेब्रुवारी मध्यात डहाणू फळबाजारत तो दृष्टीस पडू लागला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी तसेच केरळ आणि कर्नाटक मधून येणारा हापूस महाग असल्याने खिशाला परवडणारा नाही. दरम्यान मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता असून किमती उतरतील त्यामुळे सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखता येईल असे डहाणूतील विक्र ेत्यांचे म्हणणे आहे. या वर्षी हवामानातील बदलांमुळे तीन टप्प्यात आंब्याचा बहार आला आहे. पहिल्या टप्प्यात आलेला मोहर खूपच कमी आणि मोजक्या झाडांना आला होता. दुसऱ्या टप्प्यातील मोहराला ढगाळ व दमट हवामानाचा सामना करावा लागला. त्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात बागायती आणि रानमाळावरील सर्वच झाडे मोहरली दिसत आहेत. त्या मुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील स्थानिक पिकलेला आंबा एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल असे डहाणूतील आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. हापूस अत्यंत महाग असल्याने या परिसरातील खवैय्यांचा भर गावठी आंबे खाण्यावरच असतो.
गतवर्षी बोर्डीचा आंबा मलेशियात
गतवर्षीच्या हंगामातील प्रारंभीचा तयार आंबा एप्रिलच्या मध्यावर तलासरी तालुक्यातील बोरीगाव येथील आंबा बागायतदार यज्ञेश सावे यांनी मलेशियाला मोठ्या प्रमाणात निर्यात केला होता.
दुसऱ्या व तिसऱ्या बहरातील आंबे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील.
-कृषिभूषण यज्ञेश सावे (बागायतदार)