मनोरला सामुदायिक विवाह उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:33 PM2019-01-28T23:33:44+5:302019-01-28T23:33:50+5:30
आदिवासी मित्र मंडळाचा उपक्रम; १०१ जोडपी गृहस्थाश्रमात, भगेरीया ट्रस्टचे सहकार्य
मनोर : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आदिवासी मित्र मंडळ व रत्नादेवी भगेरीया चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे १०१ गोरगरीब आदिवासी समाजातील जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा मनोर जवळील काजूपाडा येथे पार पडला. त्यावेळी त्यांना एक मंगळसूत्र कपडे व संसारोपयोगी इतर वस्तू देण्यात आल्यात. त्या वेळी फिरत्या दवाखान्याचे उदघाटन खा राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
गोरगरीब आदिवासी समाजातील उपवरांच्या लग्नासाठी त्यांचे वडील सावकारापासून कर्ज घेतात व नवविवाहित हे आयुष्यभर लगीनगडी होऊन एकप्रकारे वेठबिगाराच्या स्वरुपात कर्ज फेडत असतो ही बाब लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षा पासून आदिवासी मित्र मंडळ चे अध्यक्ष संतोष जनाटे व त्यांचे सहकारी यांनी मनोर परिसरातील जोडप्यांचे सामुदायिक विवाह लावण्याचा उपक्रम सुरू केला. रत्नादेवी भागेरीया चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने रविवारी १०१ जोडप्यांचे शुभमंगल झाले.
यावेळी खा राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, जि.प. अध्यक्ष विजय खरपडे, बाबजी कठोळे धनश्री चोधरी सभापती महिला बालकल्याण, पूर्णिमा दतेला सरपंच मनोर, दर्शन दुमडा समनवयक सदस्य, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.आदिवासी मित्र मंडळ चे अध्यक्ष संतोष जनाटे ,किशन भुयाल, दामोदर काकड,सुनील किरिकरा व इतर सदस्यांनी गेल्या आठ दिवशा पासून गाव पाड्यावर फिरून लग्नासाठी लाभार्थ्यांची निवड केली शोहला यशस्वी पार पडला.