काँग्रेस पदाधिकाऱ्याविरुद्ध मनोरला अपहरणाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 05:25 AM2018-12-17T05:25:33+5:302018-12-17T05:26:08+5:30

रस्त्याच्या विद्रुपीकरणास विरोध नडला

Manor's offense against Congress office bearer | काँग्रेस पदाधिकाऱ्याविरुद्ध मनोरला अपहरणाचा गुन्हा

काँग्रेस पदाधिकाऱ्याविरुद्ध मनोरला अपहरणाचा गुन्हा

Next

वसई : सार्वजनिक ठिकाणी बॅनर, पोस्टरबाजी करून रस्त्यांचे विद्रुपीकरण करण्याºया भाजप कार्यकर्त्यांना रोखणाºया वसईतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी मारहाण आणि अपहरणाचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे,
त्यातच काँग्रेस पक्ष कार्यकर्ते कायद्याच्या कचाट्यात सापडले असताना त्यांच्या मदतीला काँग्रेस पक्षाऐवजी चक्क बहुजन विकास आघाडीचे विरार व पालघर मधील नेते मंडळी धावून गेल्याची माहिती मिळते आहे. युवक काँग्रेसचे कुलदीप वर्तक आणि त्यांचे सहकारी संजय मिश्रा, सुनील कोवाल, प्रतीक वर्तक यांच्यासह जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी येथे आले होते.

रात्री ८ वाजता वर्तक हे सफाळे -पारगाव -वरई महामार्गाने वसईकडे येत असतांना काही मुले भाजपाची निशाणी असलेल्या कमळाची चित्रे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कठड्यावर लावत असल्याचे आढळले. त्यावेळी वर्तक आणि त्यांच्या सहकाºयांनी याबाबत मुलांना हटकले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक चित्र चिकटवण्यासाठी दहा रुपये दराने आपणास हे काम दिल्याचे सांगितले, परिणामी वर्तक यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना मोबाइल वरून ही गंभीर बाब कथन केली. त्यानंतर वर्तक यांनी या मुलांना नजीकच्या मनोर पोलीस ठाण्यात नेले मात्र याच मुलांनी त्यांच्या मोबाईलवरून पालघर भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती दिल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनोर पोलीस ठाण्यात जमून दबाव आणला आणि समस्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या मुलांना जबरदस्तीने पळवले असून त्यांना मारहाण केल्याचा खोटा गुन्हा त्यांच्या विरोधात नोंदविला. या प्रकरणी आपण वरिष्ठस्तरावर दाद मागणार असल्याचेही वर्तक यांनी सांगितले.
पक्ष कार्यकर्ते अडचणीत असताना पालघरमधील काँग्रेसचा कोणताही वरिष्ठ नेता साधा फिरकला नाही अथवा मदतीला धावून आला नाही मात्र बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते मात्र मदतीला धावून आल्याची जोरदार वदंता पालघर जिल्ह्यात सुरु आहे, त्यामुळे पुढील काळात राजकारणाची समीकरणे बदलणार कि काय असेच चित्र दिसते आहे.
 

Web Title: Manor's offense against Congress office bearer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.