जागेअभावी मनोरचे बसस्थानक २५ वर्षांपासून रस्त्यावरच
By admin | Published: December 15, 2015 12:43 AM2015-12-15T00:43:33+5:302015-12-15T00:43:33+5:30
महामंडळ एसटीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मनोरच्या बसस्थानक रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला व इतर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
मनोर : महामंडळ एसटीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मनोरच्या बसस्थानक रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला व इतर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
दर दिवशी जिल्ह्यातील आठ बस डेपोतून २४० ते २५० एसटी बस मनोरवरून ये-जा करतात. मात्र गेल्या २५ वर्षांपासून महामंडळ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.
संभाव्य तालुक्याच्या यादीत मनोरचे नाव असून नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. मात्र, सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांसाठी मनोर बस स्थानकावर वाडा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ७ बाय
१२ चे रॉड नादुरूस्त अवस्थेत आहेत. त्यामागे स्वच्छालय फक्त नावाला आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली. तसेच पालघरच्या दिशेने जाणाऱ्या
प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहून बस धरावी लागते.
उत्पन्न भरपूर, पण सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष
मनोरच्या परिसरातील ५० ते ६० गावातील नागरिक मनोर येथे येऊन नाशिक जव्हार नंदुरबार कल्याण, भिवंडी, ठाणे, शहापूर, वाडा, कोल्हापूर, पालघर, बोईसर, मोखाडा जाण्यासाठी एसटी बस पकडतात. पालघर जिल्ह्यातील आठ बस डेपोतील दर दिवस २४० ते२५० बस मनोरवरुन ये-जा करतात.
गेल्या पंचवीस वर्षापासून आजपर्यंत कोट्यवधी रुपये मनोर बसस्थानक येथून एसटी महामंडळाला फायदा झाला असून मात्र आजपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी बसस्थानक व्हावे तेथे प्रवाशांसाठी स्वच्छालय, पाणी पिण्याची सुविधा, वयोवृद्धांसाठी, महिलांसाठी, शाळकरी मुलांसाठी बसण्यासाठी आसने अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा केलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
जागा उपलब्ध करून दिली तर एसटी महामंडळकडून मोठा बसस्थानक बनवू शकते. आमच्यामार्फत तसे शासनाला प्रस्तावही पाठविण्यात आले आहे. मात्र जागेअभावी प्र्रकरण प्रलंबित आहे.
- डी.ए. मोरे, विभाग यंत्रणा, पालघर
बसस्थानक नसल्याने पावसाळ्यात प्रवाशांना छत्र्या उघडून रस्त्यावर बसची वाट बघत उभे राहावे लागते.
- इक्बाल चिखलेकर,
अध्यक्ष अल्पसंख्याक, जि. पालघर
हा संभाव्य तालुका आहे. लोकसंख्या भरपूर वाढली. परंतु मनोरचे महत्वाचे बसस्थानक स्थानक नसून थांब्यासारखे आहे. येथे मोठे बसस्थानक होणे गरजेचे आहे.
- दिलीप देसाई, माजी उपतालुका प्रमुख शिवसेना, मनोर