कासटवाडी रस्ता निसरडा झाल्याने अनेक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:35 AM2018-06-27T01:35:53+5:302018-06-27T01:35:56+5:30

जव्हार मनोर अहमदाबाद हायवे आणि जव्हार शहरापासून अगदी ६ कि.मी. अंतरावरील कासटवाडी गावाजवळ

Many accidents due to the slippery road of Kasautwadi | कासटवाडी रस्ता निसरडा झाल्याने अनेक अपघात

कासटवाडी रस्ता निसरडा झाल्याने अनेक अपघात

Next

जव्हार : जव्हार मनोर अहमदाबाद हायवे आणि जव्हार शहरापासून अगदी ६ कि.मी. अंतरावरील कासटवाडी गावाजवळ वाहने घसरून शुक्रवारपासून ते सोमवार या काळात चार ते पाच अपघात घडले आहेत. पाऊस सुरु असला कि, रस्ता निसरडा झाल्याने वाहनांचा ताबा सुटून घडलेल्या अपघातांमध्ये २७ जण जखमी झाले आहेत. तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
सततच्या अपघाताने गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कासटवाडी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मे २०१८ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र ते करतांना ठेकेदाराने आॅइलमिश्रीत डांबर वापरल्यामुळे रस्ता निसरडा होवून, वाहने स्लिप होऊन अपघात घडत आहेत.
एका अपघातात चालकाचा जीप वरील ताबा सुटून तिने रस्त्याच्याकडेने चालणाऱ्या महिलेला उडविले. तर त्याच ठिकाणी शनिवारी झाडावर आदळून बसचा अपघात झाला. रविवारी तिसºया दिवशी वाडा जव्हार या बसने उभ्या असलेल्या कारला मागून धडक दिली तर उभ्या असलेल्या बसला मागून येऊन पिकअप धडकली. सोमवारी संध्याकाळी ट्रक आणि बस यांच्यात समोरासमोर धडक झाली आणि मागून येणाºया ट्रकचा ताबा सुटल्यामुळे ट्रकही त्याच ठिकाणी झाडाला जाऊन आदळली, मात्र यात बस मधील प्रवासी सुदैवाने जखमी झाले नाहीत. तर पाऊस सुरु असतांनाही बाईकस्वरांचे लहानमोठे अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कासटवाडी गावाजवळ स्पीड ब्रेकर नाही. त्यातच रस्ता सरळ असल्यामुळे येणारी वाहने वेगाने येतात. त्यामुळे रोजच अपघात घडताहेत. बांधकाम विभागाने येथे स्पीड ब्रेकर निर्माण करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. याच ठिकाणी अगोदरच वन विभागाचा तपासणी नाका आहे. मात्र या नाक्यावर वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी राहत नाही. जर का वन विभागाचा तपासणी नाका सुरु असता, तर वाहनांवर थोडेफार नियंत्रण असते, असेही गावक-यांकडून सांगण्यात येते. तसेच या ठिकाणी पोलीसचौकी असावी त्यामुळे तिच्या दराºयाने वाहकावर नियंत्रण राहील.
मार्च २०१८ ला हा रस्ता राज्य महामार्गकडे हस्तांतरीत करण्यात आला तरीही सा. बां. विभागाने ठेकेदाराला मे २०१८ मध्ये रस्ता तयार करण्यास परवानगी दिली मात्र ठेकेदाराने घाईघाईत थातूर मातूर काम करून रस्त्यावर वर आॅइल व केरोसीन मिश्रित माल वापरून रस्ता तयार केला आहे, यात शाखा अभियंता व बांधकाम विभागाचे अन्य अधिकारीही सामिल आसून यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
या रस्त्याचा काही भाग यंदा तयार करण्यात आला आहे, मात्र रस्ता पावसामुळे निसरडा झाला असून वाहन चालकाने या भागात वाहने कमी गतीने चालवले तर अपघात घडणार नाहीत असा सल्ला शाखा अभियंता डी. डी. पाटील यांनी दिला. जर रास्ता राज्य महामार्ग कडे वर्ग केला होता तर ठेकेदाराला या वर्षात काम का करू दिले? काम सुरू असतांना राज्य महामार्गचे अधिकारी व कर्मचाºयांनी हे बोगस काम का करू दिले ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांची उत्तरे मात्र कोणाकडेच नाहीत. अशी अवस्था आहे.

Web Title: Many accidents due to the slippery road of Kasautwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.