वसईतील अनेक गटारांवरील झाकणे गायब, महापालिकेचे दुर्लक्ष, दुर्घटना घडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 05:48 AM2017-09-11T05:48:12+5:302017-09-11T05:48:33+5:30

महापालिका हद्दीतील गटारांवरील अनेक ठिकाणची झाकणे गायब झाली आहेत. काही अर्धवट अवस्थेत असून काही पूर्ण तुटलेली आहेत. त्यामुळे गटारे उघडी पडली असून त्यात पडून जीव गमावण्याची अथवा दुखापत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Many covered gutters disappeared in Vasai, neglect of municipal corporation, possibility of accident | वसईतील अनेक गटारांवरील झाकणे गायब, महापालिकेचे दुर्लक्ष, दुर्घटना घडण्याची शक्यता

वसईतील अनेक गटारांवरील झाकणे गायब, महापालिकेचे दुर्लक्ष, दुर्घटना घडण्याची शक्यता

Next

 वसई -  या महापालिका हद्दीतील गटारांवरील अनेक ठिकाणची झाकणे गायब झाली आहेत. काही अर्धवट अवस्थेत असून काही पूर्ण तुटलेली आहेत. त्यामुळे गटारे उघडी पडली असून त्यात पडून जीव गमावण्याची अथवा दुखापत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई झालेल्या पावसात गटारवर झाकणे नसल्याने त्यात पडून वाहून जाऊन दोन डॉक्टरांचा बुडून मृत्यु झाला होता. त्या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका हद्दीतील गटारांवरील अनेक ठिकाणची झाकणे गायब झाल्याची बाब युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी उजेडात आणली आहे. वर्तक यांनी आपल्या सहकाºयांसह केलेल्या पाहणीत शहरातील अनेक ठिकाणच्या गटारांची झाकणे गायब, तुटल्याची, अर्धवट अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. त्यांनी फोटोंसह त्याची आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
पावसाळ््यापूर्वी शहरात व्यवस्थित नालेसफाई झालेली नाही. अधिकारी आणि ठेकेदारांची लॉबी दरवर्षी नालेसफाईतून हातसफाई करीत महापालिकेची तिजोरी लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यात आता गटारांवरील झाकणांचा नवा प्रश्न उजेडात आला आहे. गटार बांधल्यानंतर मेनहॉल चेंबरवर झाकणे लावणे गरजेचे असते. पण, अनेकवेळा ती लावली जात नाहीत. लावलेली झाकणे निकृष्ट दर्जाची असल्याने लगेचच तुटतात. तर लोखंडी झाकणे नीट बसवली जात नसल्याने ती चोरीला जातात. याकडेही त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
मेनहॉल चेंबरवर झाकणे नसल्याने पावसाळ््यात जलमय स्थितीत निर्माण होऊन त्यात नागरीक पडून जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. तर अनेक वेळा त्यात पडून वाहून जाऊन त्यांना जीवालाही मुकावे लागण्याचा प्रकार घडू शकतो. नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन गटारांवरील तुटलेली झाकणे बदलावीत, गायब असलेल्या ठिकाणी झाकणे बसवून मेनहोल ताबडतोब बंद करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 

Web Title: Many covered gutters disappeared in Vasai, neglect of municipal corporation, possibility of accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.