मराठा समाजाचा जिल्ह्यात आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:20 AM2018-07-25T02:20:15+5:302018-07-25T02:20:54+5:30
जीवनावश्यक सेवा वगळल्या; तहसीलदारांना देणार निवेदन
पालघर : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यसरकारला जागे करण्यासाठी सकल मराठा समाजाने बुधवारी पालघर जिल्ह्यात बंद पाळण्याचे आवाहन केले असून या बंद मधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. हा बंद शांततेत व शिस्तबद्धतेने पाळण्याचे आवाहनही संघटकांनी केले आहे.
याबाबतच्या निवेदनात समाजाने म्हटले आहे की, मराठा तरु णानी हा बंद शांतता पूर्ण वातावरणात पार पाडायचा आहे. आंदोलनात घुसून तोडफोड करणाऱ्या प्रवृतीमुळे समाजाची बदनामी होणार नाही याबाबत जागरूक राहायचे आहे. मराठा समाजाचा आक्र ोश हा राजकीय पक्ष आणि सरकार विरोधी आहे त्याला जातीय रंग देऊ नये
कोणत्याही प्रकारे इतर समाजाच्या भावना दुखावणाºया आणि सामाजिक तेढ निर्माण करणाºया बाबींपासून स्वताला आणि इतराना दूर ठेवावे. अॅम्ब्युलन्स आणि अत्यावश्यक सेवा देणाºया दवाखाने मेडिकल स्टोअर्स यांना बंद पाळण्यासाठी दबाव टाकू नये. आपला आक्रोश व्यक्त करणाºया घोषणा करतांना अश्लील भाषा आणि शिव्या यांचा वापर करू नये.
समन्वयकांनी दिल्यात आंदोलकांना सूचना
पोलीस वा प्रशासनाशी हुज्जत न घालता त्यांच्याशी समन्वय साधून आंदोलन यशस्वी करावे.भडकावू पोस्ट व्हीडियो व्हायरल करू नये. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून आंदोलन चिघळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, पोलीस प्रशासनाने आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नये.
महिला आणि मुले यांना त्रास होणार नाही. यांची काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विशवास ठेवू नये कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला राजकीय वळण लागू देऊ नये समस्या सोडविण्यासाठी आपण रस्त्यावर आलो आहोत. राजकारणासाठी नाही याची जाणीव सर्वानी ठेवावी