जपानचे मराठी आमदार १३ जानेवारीला विरारमध्ये; १९ व्या जागतिक मराठी संमेलनाचे भूषवणार अध्यक्षपद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 06:59 PM2023-12-23T18:59:55+5:302023-12-23T19:00:24+5:30

जागतिक मराठी अकादमीतर्फे शोध मराठी मनाचा हे १९ वे जागतिक मराठी संमेलन १३ व १४ जानेवारीला विरारमध्ये होणार आहे.

Marathi MLA of Japan in Virar on January 13 19th World Marathi Conference will hold the post of President | जपानचे मराठी आमदार १३ जानेवारीला विरारमध्ये; १९ व्या जागतिक मराठी संमेलनाचे भूषवणार अध्यक्षपद

जपानचे मराठी आमदार १३ जानेवारीला विरारमध्ये; १९ व्या जागतिक मराठी संमेलनाचे भूषवणार अध्यक्षपद

 (मंगेश कराळे)

नालासोपारा: जागतिक मराठी अकादमीतर्फे शोध मराठी मनाचा हे १९ वे जागतिक मराठी संमेलन १३ व १४ जानेवारीला विरारमध्ये होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद जपानचे मराठी आमदार योगेंद्र पुराणिक हे भूषवणार असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामचंद्र फुटाणे यांनी शनिवारी विरारच्या विवा कॉलेजमधील पत्रकार परिषदेत दिली आहे. या संमेलनाला देश विदेशातील  नामवंत व्यवसायिक, साहित्यिक, सिनेकलावंत हजर राहणार आहेत. 

जागतिक मराठी अकादमीतर्फे दरवर्षी शोध मराठी मनाचा हे जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदाचे १९ वे वर्ष असून यावेळी साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे संमेलन होणार आहे. जपानमधील उद्योजक आणि आमदार योगेंद्र पुराणिक या संमेलनाचे उदघाटक असणार आहेत. त्यांना विश्वभूषण पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजिवनी खेर यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. ‘मनुस्मृती ते मंडल आयोग’, ‘कृत्रिम बुध्दीमता’, ‘मराठी चित्रपटाचे भवितव्य’ आदी विविध विषयांवर या संमेलनात परिवसंवाद रंगणार आहेत. ‘मनुस्मृती ते मंडल आयोग’ या विषयावरील परिसंवादात रावसाहेब कसबे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड तसेच तुकाराम चिंचणीकर सहभागी होणार आहे. चित्रशिल्प काव्य यंदाच्या संमेलनाचे वैशिष्ट्य असणार आहे. आयोजनाची सर्व जबाबदारी आमच्या ट्रस्टतर्फे केली जाणार असल्याची माहिती आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.
 

Web Title: Marathi MLA of Japan in Virar on January 13 19th World Marathi Conference will hold the post of President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.