डहाणूच्या किनाऱ्यावर समुद्री कासव

By Admin | Published: March 18, 2017 03:03 AM2017-03-18T03:03:22+5:302017-03-18T03:03:22+5:30

तालुकातील समुद्रकिनारा समुद्री कासवांसाठी नंदनवन आहे. मात्र दिवसेंदेवास वाढत्या पर्यावरण ऱ्हासामुळे प्रतिवर्षी ४० ते ५० जखमी आणि मृत अवस्थेतील कासवं आढळून येतात.

Marine Turtle on Dahunu Shore | डहाणूच्या किनाऱ्यावर समुद्री कासव

डहाणूच्या किनाऱ्यावर समुद्री कासव

googlenewsNext

डहाणू : तालुकातील समुद्रकिनारा समुद्री कासवांसाठी नंदनवन आहे. मात्र दिवसेंदेवास वाढत्या पर्यावरण ऱ्हासामुळे प्रतिवर्षी ४० ते ५० जखमी आणि मृत अवस्थेतील कासवं आढळून येतात. दरम्यान एका बाजूने हा आकडा वाढत जाणारा असून विणीच्या हंगामात खोऱ्याने अंडी घालणारी परंपरा खंडीत होत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
डहाणू तालुक्याला सुमारे ३५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हा भाग जैवविविधतेने समृद्ध असल्याने डॉल्फिन, समुद्री कासव तसेच माशांच्या विविध प्रजाती माठ्या प्रमाणात आहेत. प्रतिवर्षी किमान ४० ते ५० जखमी आणि मृत अवस्थेत आढळणाऱ्या या कासवांची संख्या मागील काही वर्षात झपाट्याने वाढली आहे. मासे पकडण्यासाठी वापरली जाणारी आधुनिक पद्धतीची जाळी हे त्यामागील कारण असले. तरीही किनाऱ्यालगत सुरू तसेच कांदळवनांचे घटते प्रमाण, थेट समुद्रात वाहनं उतरवून होणारा अवैध रेती उपसा, खाजण क्षेत्रावर भराव तसेच उच्चतम भरती रेषेच्या मर्यादेचे खुल्लेआम उल्लंघन करून बांधकामाचे पेव फुटणे ही त्यामागील प्रमुख कारणं आहेत. वन, महसूल, खारभूमी, मेरीटाईम आणि स्थानिक स्वराज्य संस्था आदि प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे ऱ्हासाचे प्रमाण वाढले आहे.
देशात पर्यावरणदृष्ट्या आठ क्षेत्र संरिक्षत म्हणून घोषीत असून त्यामध्ये डहाणूचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने २००२ साली डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करून निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यामुळे पर्यावरण विरोधक कृत्यांवर अंकुश आला असून हा ठेवा अबाधित राखण्यास मदत झाली आहे. मात्र काही वर्षांपासून विकासाच्या नावाखाली १९९१ चे नोटिफिकेशन हटवण्याची मागणी येथील काही गटाकडून केली जात असून लोकप्रतिनिधींनीही शासन दरबारी त्याची री ओढली आहे.

डहाणूचे पर्यावरण शाबूत राहण्यात प्राधिकरणाचा महत्वाचा वाटा आहे. धनाढ्य मंडळी प्रशासनावर राजकीय दबाब आणून नोटोफिकेशन हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न करित आहेत. डहाणूचा समतोल विकास हा पर्यावरणाचा आधारिबंदु असल्याने पर्यावरणाशी तडजोड करणारा कोणताही निर्णय विनाशाची नांदी ठरेल.
- प्रवीण ना. दवणे,
पर्यावरण अभ्यासक

Web Title: Marine Turtle on Dahunu Shore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.