नालासाेपाऱ्यात महिलेवर सामूहिक अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 08:37 AM2021-03-20T08:37:59+5:302021-03-20T08:38:23+5:30

नालासोपारा शहरात राहणारी ही महिला घरकाम करते. याठिकाणी आरोपी अमित तिवारी याच्यासोबत महिलेची ओळख झाली होती. त्याने नवीन ठिकाणी चांगले काम देण्याचे प्रलाेभन दाखवले. फेब्रुवारी २०२०मध्ये विरार येथे कामाला असताना आरोपी अमित हा डिलिव्हरी करण्यासाठी आला असताना त्यांना भेटला. 

Mass atrocities on woman in Nalasapara | नालासाेपाऱ्यात महिलेवर सामूहिक अत्याचार 

नालासाेपाऱ्यात महिलेवर सामूहिक अत्याचार 

Next

नालासोपारा : काम देण्याच्या बहाण्याने नेवून ३७ वर्षीय पीडित महिलेवर दोन आरोपींनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी दोन आरोपींना संध्याकाळी ताब्यात घेतले असून,  यातील आणखी एका फरार आरोपीचा पाेलीस शोध घेत आहेत.

नालासोपारा शहरात राहणारी ही महिला घरकाम करते. याठिकाणी आरोपी अमित तिवारी याच्यासोबत महिलेची ओळख झाली होती. त्याने नवीन ठिकाणी चांगले काम देण्याचे प्रलाेभन दाखवले. फेब्रुवारी २०२०मध्ये विरार येथे कामाला असताना आरोपी अमित हा डिलिव्हरी करण्यासाठी आला असताना त्यांना भेटला. 

त्याने पीडित महिलेला जेवण बनविण्याचे नवीन काम देतो, असे सांगून दुचाकीवर बसवून नालासोपाऱ्यातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सदनिकेत घेऊन गेला.  तिथे आरोपी अमित तिवारी आणि त्याचा साथीदार पवन याने तिच्यावर चार वेळा अत्याचार केला. या दोघांना नालासोपारा पोलिसांनी पकडले असून, फरार आरोपीचा काय सहभाग आहे, हे त्याला पकडल्यावर कळेल, असे नालासोपाराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी ‘लोकमत’ला सांगितल.
 
Web Title: Mass atrocities on woman in Nalasapara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.