पेपरफुटीच्या मास्टरमाइंडला नागपूर येथे अटक

By admin | Published: November 7, 2015 10:19 PM2015-11-07T22:19:46+5:302015-11-07T22:19:46+5:30

या जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक -टंकलेखक परिक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करून आपल्या टोळीद्वारे इतर केंद्रातील परिक्षार्थींना उत्तरे पाठविण्याच्या गुन्ह्यातील मास्टरमार्इंड

The mastermind of paperfruit was arrested in Nagpur | पेपरफुटीच्या मास्टरमाइंडला नागपूर येथे अटक

पेपरफुटीच्या मास्टरमाइंडला नागपूर येथे अटक

Next

पालघर : या जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक -टंकलेखक परिक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करून आपल्या टोळीद्वारे इतर केंद्रातील परिक्षार्थींना उत्तरे पाठविण्याच्या गुन्ह्यातील मास्टरमार्इंड अमर विठ्ठलराव खंडाळकर (३६) रा. यवतमाळ यास स्थानिक गुन्हे शाखेने नागपुर येथून अटक केली आहे. त्यामुळे लवकरच या परिक्षा गैरव्यवहारातील टोळीचा बिमोड करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिम गुन्हे शाखेचे पो. नि. ऐ. व्हनमाने यांनी दिली.
परिक्षेमधील गैरप्रकाराची मोठ्या व्याप्तीची शक्यता पाहता जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी परिक्षा रद्द करून पुन्हा १८ आॅक्टोबर रोजी परिक्षा प्रक्रिया नव्याने राबविली होती. या परीक्षेवेळी कुठलाही अनुचीत प्रकार घडणार नाही यासाठी प्रशासनाने सर्व पातळीवर दक्षता घेतली असतानाही तारापुर टॅप्स परिक्षा केंद्रात मोबाईल नेणाऱ्या संगिता नारायण सुराडकर (३०) रा. जालना व वसई केंद्रातील परिक्षार्थी अरूण शामराव गवळी या दोघांना पोलीसांनी अटक केली होती.
सरळसेवा भरती प्रक्रियेत दोन वेळा गैरप्रकार झाल्याने या प्रकरणात मास्टरमार्इंड असल्याची माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. यावेळी या गुन्ह्यात मास्टरमार्इंड अमर खंडाळकर या फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास कवासे यांनी नागपुर येथे अटक केली. आरोपी खंडाळकर उच्चशिक्षित असून स्पर्धापरिक्षेचे क्लासेस चालवितो. त्याने पालघर येथे परिक्षा देताना स्वत:चे नावात चार वेळा बदल करून चार परिक्षाकेंद्राची निवड केली होती. ज्या परिक्षा केंद्रामध्ये मोठ्या बॅचेस असतील ज्या ठिकाणाहून मोबाईलचा खुबीने वापर करता येईल असे परिक्षा केंद्र निवडताना त्यांनी वसई तालुक्यातील एम. के. शेठ, गुजराती हायस्कूल माणीकपूर हे परिक्षा केंद्र निवडले. स्वत:चे पेपर अवघ्या अर्धा तासात सोडवून त्यातील उत्तराचे क्रमांक ५-५ च्या ग्रुपने मोबाईलद्वारे आपल्या टोळीतील बाहेरच्या साथीदाराना पाठवून त्यांच्या मार्फत परिक्षा केंद्रावरील गैरप्रकार करणाऱ्या परिक्षार्थींना पाठविण्यात आले होते. ]
या प्रकरणात चार परिक्षार्थी सह मुख्य सुत्रधार असे पाच आरोपींना अटक करण्यात आले असून मोठे रॅकेट असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीचा बिमोड करण्यासाठी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरविली होती. (वार्ताहर)

- पालघर जिल्हा कार्यालयातील महसूल विभागातील लिपीक -टंकलेखक सरळ सेवा भरती परिक्षा प्रथम ४ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली होती. त्यावेळी पालघरच्या आर्यन शाळा परिक्षाकेंद्रामध्ये मोबाइल नेऊन त्याद्वारे प्रश्न व उत्तरांची देवाणघेवाण करताना राजीव प्रकाश झडके रा. उमरखेडा जि. यवतमाळ व राजु इनोता अंबोरे रा. माहुर जि. नांदेड या दोन आरोपी परिक्षार्थींना अटक करण्यात आली होती.

Web Title: The mastermind of paperfruit was arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.