पालघरच्या विकासाला मौनी नगरसेवक मारक; नगर परिषदेवर वाढती जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:16 PM2019-06-07T23:16:24+5:302019-06-07T23:16:49+5:30

पालघर पालिकेसह २६ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ज्या गावांना पाणीपुरवठा होत आहे अशा सर्व गावाकरिता नगर परिषद मार्फत पाण्याचे मीटर बसविण्यात यावी यावर पाणीपुरवठा सभापती उपनगराध्यक्ष उत्तम घरत यांनी सांगितले.

Mauni corporator killed for development of Palghar; Increasing responsibility on the Municipal Council | पालघरच्या विकासाला मौनी नगरसेवक मारक; नगर परिषदेवर वाढती जबाबदारी

पालघरच्या विकासाला मौनी नगरसेवक मारक; नगर परिषदेवर वाढती जबाबदारी

Next

पालघर : नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या गुरु वारी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत झालेल्या अनेक विषयांच्या चर्चेत बऱ्याच नगरसेवकांची मौनी भूमिका शहराच्या विकासाला मारक ठरु शकते. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या या नगरपरिषदेला या ठपक्यातून बाहेर काढण्यासाठी विद्यमान नविनयुक्त नगरसेवकांना नगरपरिषदेची कर्तव्ये, अधिकार आणि कामाची माहिती करून घेत ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.

गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण पहिल्याच सभेत नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे यांनी पालघरचा विकास हे ध्येय ठेवून एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून काम करण्याचे आवाहन करीत काही विकासात्मक कामांना मंजुरी मिळवून घेतली. पालघर नगरपरिषदेची स्वत:ची इमारतच धोकादायक असताना नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरु वारी त्याच इमारती मध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेत इमारतीचे नूतनीकरण करणे, नवीन इमारतीच्या उभारणीसाठी जागा शोधणे, मंजूर झालेल्या वैशिष्ठ्य पूर्ण निधीतून इमारत बांधणे, २६ गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून करण्यात येणाºया पाणी वितरणा दरम्यान मीटर्स बसविणे, डान्स प्रतिबंधक औषध फवारणी, विद्युत पोलची उभारणी आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

नगरपरिषदेच्या कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्याने तात्पुरत्या इमारतीची दुरुस्ती करणे व व नव्याने उभारायच्या इमारतीसाठी शासनाकडे जागा प्रस्तावित करण्यासाठी प्रस्ताव पाठविणे, सद्य स्थितीतील नगरपरिषद कार्यालयाच्या नूतनीकरण आणि मजबुतीकरणाच्या विषयावर चर्चा करून मजबुती करणाचा ठरावही घेण्यात आला. सेनेचे गटनेते कैलास म्हात्रे, सभापती सुभाष पाटील, भावानंद संखे, रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे, अमोल पाटील आदींनी यात सहभाग घेतला.

घंटा गाड्या वेळीच कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने काही लोक कचरा रस्त्यावर फेकीत असल्या बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक प्रभागात विद्युतपोलच्या उभारणीची मागणीवर आवश्यकते प्रमाणे मागणी करण्यात यावी असे चर्चे अंती ठरविण्यात आले. या सभेत अनेक विषयांवर चर्चा झाली असली तरी नवनियुक्त नगरसेवक, नगरसेविका मध्ये महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमान्वये कर्तव्ये, कायदे यांची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना मौनी भूमिकेत रहावे लागल्याचे दिसून आले.

विचारविनिमय होऊन सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली कोट्यवधीचा खर्च जंतुनाशक व कीटकनाशक फवारणी वर होतो मात्र मच्छर कमी होत नाही. बोगस कीटकनाशके तसे फवारणी नीट होत नसणे आदी मुद्यावर बोट ठेवून फवारणीसाठी अधिक माणसे वाढवावेत कीटकनाशके तपासून घ्यावी आदी सूचना नगरसेवकांनी केल्या. तसेच घनकचरा घेण्यासाठी घंटागाड्या येत नाहीत यावर उपाययोजना करावी आधी सूचना करण्यात आल्या यावर नगराध्यक्ष उज्वला काळे यांनी कीटकनाशके खरेदी आणि यावर अधिक लक्ष दिले जाईल यासाठी नगरसेवकांचे सहकार्य पाहिजे घंटागाड्यावाल्यांना कचरा घेण्यासाठी वेळेवर जावी अशा सूचना दिल्या जातील अधिक कीटकनाशके व वाढीव मजूर या कामासाठी मंजूरी देण्यात आली.

पालघर पालिकेसह २६ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ज्या गावांना पाणीपुरवठा होत आहे अशा सर्व गावाकरिता नगर परिषद मार्फत पाण्याचे मीटर बसविण्यात यावी यावर पाणीपुरवठा सभापती उपनगराध्यक्ष उत्तम घरत यांनी सांगितले. पालघर ०६:२६ गावाची पाणीपुरवठा योजना महापालिका चालवत आहे. मात्र, काही ग्रामपंचायती पाणीपट्टी भरीत नाही त्यामुळे पाच कोटीचा तोटा झाला आहे. गर्भ हा पाणीपुरवठा विद्युत दिन ३८ लक्ष येत आहे त्यातील काही भाग काही ग्रामपंचायतीकडून येत आहे मात्र सर्व भार नगरपरिषदेवर पडत आहे त्यामुळे तो न भरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

बिले अदा न करणाºया ग्रामपंचायतींची जोडणी कापणार
२६ गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत आता २८ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असताना त्यातील काही ग्रामपंचायती वापरातील पाण्याची योग्य बिले भरीत नसल्याने नागरपरिषदेला वार्षिक सुमारे ५ कोटींचा तोटा होत असल्याच्या मुद्द्यावर ही चर्चा होत पाण्याची बिले अदा न करणाºया ग्रामपंचायतीची जोडणी कापण्याचा ठराव ही घेण्यात आला.

शहरामध्ये डास निर्मूलन, जंतुनाशक व किटकनाशक फवारणीच्या कामाबाबतच्या चर्चेत कोट्यवधी रु पयांचा खर्च होऊन ही डासांची उत्पत्ती आणि त्यांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यास हा ठेका रद्द करून नवीन औषधे खरेदी करून नवीन ठेकेदार नेमण्याची मागणी करण्यात आली. कचरा ठेक्याबाबत ही नाराजी व्यक्त करीत ठेकेदार पालिकेच्या शर्ती अटींची पूर्तता करीत नसल्याने हा ठेका रद्द करण्याबाबत पुनिर्वचार करण्याची मागणी नगरसेवकानी केली.

Web Title: Mauni corporator killed for development of Palghar; Increasing responsibility on the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.