भूकंपाची कारणे शोधण्यात यंत्रणा अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:34 AM2018-12-03T00:34:33+5:302018-12-03T00:34:37+5:30
या व डहाणू तालुक्याच्या काही गावात गेल्या काही दिवसां पासून जोरदार भूकंपाचे धक्के बसत असल्याने लोकांची झोप उडाली
- सुरेश काटे
तलासरी : या व डहाणू तालुक्याच्या काही गावात गेल्या काही दिवसां पासून जोरदार भूकंपाचे धक्के बसत असल्याने लोकांची झोप उडाली असून ग्रामस्थ रात्र रात्र घराबाहेर जागून काढत आहेत. भूकंपाची भीती निर्माण झालेली असतांना शासकीय यंत्रणा मात्र अजूनही झोपेत आहे, लोकांच्या मनातील भीती काढून भूकंपाची कारणे शोधण्यास ती अपयशी ठरली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असणाऱ्या धुंदलवाडी भागात पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे शनिवारी येऊन ग्रामस्थांच्या भेटी घेऊन गेले अन पायगुण म्हणा रविवार पहाटे पुन्हा भूकंपाचे तीन जोरदार धक्के बसले, बाकीच्या लोकप्रतिनिधींना धक्का न बसल्याने ते अजून भूकंप पीडितांची भेट घेण्यास आले नाहीत कदाचित निवडणुकीत मतदार त्यांना कधी व कसा धक्का देतात याची ते वाट बघत असावेत.
दोन तीन महिन्यांपासून या भागात गूढ आवाज येत असल्याच्या जनतेच्या तक्र ारी होत्या पण शासकीय यंत्रणा त्याची दखल घेत न्हवती, पण पंधरा दिवसां पासून जोरदार धक्के बसू लागल्याने जागी झालेली शासकीय यंत्रणा या भागात दिसू लागली, पालघर जिल्हाधिकाºयांनी आपत्त कालीन यंत्रणेला या भागात मार्गदर्शन करायला पाठविले पण या भूकंपाची कारणे काय ती शोधून काढून लोकांच्या मनातील भीती दूर करण्यास मात्र शासकीय यंत्रणा अपयशी ठरली, जिल्हाधिकाºयांनी हे भूकंपाचे धक्के ३ रिश्टर स्केलचे असल्याने घाबरायचे कारण नाही असे सांगितले.
>तीव्र धक्का बसेपर्यंत आपत्कालीन यंत्रणा बेसावध?
पाच रिश्टर स्केल पेक्षा जास्त तीव्रतेचा धक्का धोकादायक असतो, त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबसह त्याची यंत्रणा ही सुस्त झाली आहे. ही यंत्रणा ५ रिश्टर अथवा त्या पेक्षा जास्त स्केलचा धक्का बसून जीवितहानी होण्याची वाट बघते आहे काय? असा सवाल जनता करते आहे.धुंदलवाडीच्या मुंबई पाड्यातील रहिवासी तर घरे दारे सोडून निघून गेले आहेत त्याच्या घरांना कुलूपे लागली असून पाडा निर्मनुष्य झाला आहे ते कुणीकडे गेलेत याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष आहे, हळदपाड्यातील लोक रात्र घराबाहेर बसून काढत आहेत, त्याकडेही यंत्रणांचे दुर्लक्ष आहे.