महिला कबड्डीपटूंचा उतरविणार दीड लाखांचा वैद्यकीय विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:54 AM2019-06-27T00:54:58+5:302019-06-27T00:55:25+5:30
डहाणू तालुका कबड्डी असोसिएशनने युवा महिला कबड्डीपट्टूंचा प्रत्येकी दीडलाखाचा वैद्यकीय विमा काढला
बोर्डी - डहाणू तालुका कबड्डी असोसिएशनने युवा महिला कबड्डीपट्टूंचा प्रत्येकी दीडलाखाचा वैद्यकीय विमा काढला असून त्याचे वाटप असोसिएशनचे अध्यक्ष वलकेश राऊत आणि सदस्य विक्रांत म्हात्रे, वैशाली सावे व प्रशिक्षक यशोधन पाटील आदींच्या हस्ते नरपडच्या अ. ज.म्हात्रे विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले.
महिला कबड्डी खेळाडूंकरिता हा उपक्र म राबविणारी जिल्ह्यातील ही पहिली असोसिएशन आहे. यामध्ये साक्षी विपुल सावे (बोर्डी), मानसी कल्पेश राऊत (वाणगाव), शिल्पा अशोक भुसारा (वाणगाव), मंजू रमेश मराड (सोगवे), उर्वशी जयप्रकाश मर्डे (गुंगवाडा), श्वेता कमलाकर दवणे (गुंगवाडा), रिद्धी दीपक धानमेहेर (कासा), क्षितिजा मंगेश राऊत (वरोर), प्रचिता जलाराम घरत (कासा), प्रमिला चंदू भोये (कासा), जागृती संजय आरदोरी (घोलवड), किरणाली नितीन पाटील (वरोर), प्रियंका योगेश राऊत (नरपड), जानव्ही राजेंद्र तांडेल(नरपड), प्रांजली राम दुबळा (डहाणू) या पैकी क्षितिजा इंजिनियर असून नोकरीला आहे. तर अन्य महाविद्यालयस्तरावर विविध ज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत.
ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार व प्रसार चांगल्या प्रकारे झाला आहे. या उपक्रमामुळे कुटुंबीयांचाही सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. शिवाय खेळाच्या माध्यमातून नोकरीच्या संधींना गवसणी घालता येईल असा विश्वास या कबड्डीपट्टूनी व्यक्त केला. त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता असोसिएशन नेहमीच कटीबद्धसल्याचे प्रतिपादन वलकेश राऊत यांनी केले. यामुळे खेळाडूत आनंद निर्माण झाला आहे.
महिला कबड्डीचा प्रचार-प्रसार व्हावा असा असोसिएशनचा प्रयत्न असून त्या अंतर्गत हा उपक्र म राबविण्यात आला. कबडीपट्टू आणि त्यांच्या कुटुंबियांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
- वलकेश राऊत (अध्यक्ष, डहाणू तालुका कबड्डी असोसिएशन)