आपत्कालीन समितीची बैठक

By Admin | Published: November 26, 2015 01:23 AM2015-11-26T01:23:22+5:302015-11-26T01:23:22+5:30

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प क्षेत्राच्या परिसरातील वातावरणामध्ये अकस्मातपणे किरणोत्सर्गाची दुर्घटना घडल्यास नागरिकांनी सुरक्षिततेबाबत कोणती खबरदारी घ्यावी

Meeting of emergency committee | आपत्कालीन समितीची बैठक

आपत्कालीन समितीची बैठक

googlenewsNext

पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्प क्षेत्राच्या परिसरातील वातावरणामध्ये अकस्मातपणे किरणोत्सर्गाची दुर्घटना घडल्यास नागरिकांनी सुरक्षिततेबाबत कोणती खबरदारी घ्यावी, याची पूर्ण माहिती त्यांना कळणे अत्यावश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी परिसरातील प्रत्येक गावामध्ये ग्रामसभेचे आयोजन करून जनजागृती करावी, असे सूचनावजा आदेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बैठकीत दिले.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जिल्हास्तरीय आपत्कालीन उपाययोजना समितीची बैठक शुक्रवारी जिल्हापरिषद संकुल, पालघर येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर, अणुऊर्जा प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात किरणोत्सारासारखी दुर्घटना घडल्यास कायकाय उपाययोजना आखता येतील, याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन मार्गदर्शन केले.
या परिस्थितीत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन अफरातफरी माजू नये म्हणून त्यांना सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे आहे. अशा वेळी गावागावांतून जाणारे रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद असल्याचे सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आले. अशा अरुंद रस्त्याबाबत नियोजनबद्ध आराखडा, अंदाजपत्रक तयार करून परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे लवकरच सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुरबे-खारेकुरण खाडीवर पूल उभारण्याबाबत संकल्पचित्र तयार करण्यात आले असून अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्याचे काम सुरू आहे. यावेळी प्रकल्पाचे वैज्ञानिक अधिकारी आर.एच. पाटील यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)

Web Title: Meeting of emergency committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.