स्मृती जव्हारच्या शाहीदरबाराच्या

By Admin | Published: October 12, 2016 03:42 AM2016-10-12T03:42:14+5:302016-10-12T03:42:14+5:30

भूतपूर्व संस्थानाची पार्श्वभूमी असलेल्या जव्हारच्या दरबारी आणि ऐतिहासिक दसऱ्याच्या आठवणी मंगळवारी जागविल्या गेल्यात दरवर्षीच्या उत्साहात यंदाही मोठया धामधूमीत

The memory of the Shahidarabara of memory | स्मृती जव्हारच्या शाहीदरबाराच्या

स्मृती जव्हारच्या शाहीदरबाराच्या

googlenewsNext

हुसेन मेमन / जव्हार
भूतपूर्व संस्थानाची पार्श्वभूमी असलेल्या जव्हारच्या दरबारी आणि ऐतिहासिक दसऱ्याच्या आठवणी मंगळवारी जागविल्या गेल्यात दरवर्षीच्या उत्साहात यंदाही मोठया धामधूमीत दसरा साजरा झाला. त्याच्या संस्थानकालीन खुणा आजच्या जव्हारमध्ये थोडया प्रमाणात शिल्लक आहेत. त्यापैकी प्रामुख्याने उल्लेख कारावयाचा झाला तर या दरबारी दसऱ्याचा उल्लेख नक्कीच अभिमानाने करता येईल. काळाच्या ओघात सर्व संस्थाने खालसा झाली असली तरी गतस्मृतींना उजाळा देणारा उत्सव म्हणजे जव्हारचा दसरा. सुमारे सहाशे वर्षे परंपरेने चालत आलेला जव्हारचा दसरा ही जव्हारकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.
अश्विन शुध्द प्रतिपदेस या उत्सवाचा प्रारंभ होत असे. नवमीचा होम झाल्यानंतर पूर्णाहुतीच्या वेळी देवीची ओटी भरली जात असे, त्यानंतर देवीस महिषासुराचा प्रतिक असणाऱ्या रेड्याचा बळी दिला जात असे. नवमीच्या दिवशी विजया दशमीच्या उत्सवाच्या तयारीस प्रारंभ होत असे भल्या पहाटे जुन्या राजवाडयातील नगारखाने सनई चौघडयांनी दुमदुमून जात. घराण्यातील व्यक्तींकडून पूजा अर्चना त्यांचप्रमाणे शस्त्रपूजा, अश्वपूजा, वाहनपूजा केली जात असे. घोडे, उंट व हत्ती यांना स्रानासाठी जव्हारजवळील जामसर येथील तळयावर नेले जात असे. सर्व विधी उरकल्यानंतर सायंकाळी दसरा मिरवणूकीस सुरूवात होत असे. राजे घोडयांच्या बग्गीत स्थानापन्न होत असत दिमाखात मिरवणूकीस प्रारंभ होत असे. दरबारी पोशाखात पाठीला ढाल व कमरेस तलवार घेऊन सर्व सरदार मंडळी, नागरिक मोठया संख्येने सहभागी होत असत. ही मिरवणूक हनुमान पॉईटवर जात असे. तेथे शमी पूजनाचा कार्यक्रम साजरा होत असे. मुलुखगिरीला दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरूवात करण्याचे प्रतिक म्हणून आठही दिशांना बाण सोडले जात. तेथे मारूतीचे दर्शन घेऊन तेथे नवीन ध्वज चढविला जात असे. त्यानंतर पुन्हा मिरवणूक परतत असे.

Web Title: The memory of the Shahidarabara of memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.