खनिज, महसूलची दीड कोटी दंडवसुली; तहसिलची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:27 PM2020-03-13T23:27:22+5:302020-03-13T23:28:30+5:30
अवैध धंद्यांविरोधात सतर्कता
राहुल वाडेकर
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील तहसील तलाठी कार्यालयातील महसूल विभागाकडून विविध भागातील १३ तलाठी कार्यक्षेत्रानुसार गौण खनिजांच्या अवैध धंद्याविरुद्ध सतर्कराहून अद्यापपर्यंत तहसीलदार श्रीधर गालिपेल्ली यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी व १३ तलाठी सजेअंतर्गत टिमने डबर, खडी गौण खनिज चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर पकडून १ कोटी ७ लाख ३० हजारांची गौण खनिजाची दंड वसुली तर जमीन महसूल अंतर्गत ३८ लाख ९८ हजार अशी दोन्ही मिळून १ कोटी ४६ लाख २८ हजारांची वसुली केली असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.
या वेळी मंडळ अधिकारी महसूल अव्वल कारकून, लिपिक तलाठी आदी अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने गौण खनिज वसुलीत मोलाचे सहकार्य केले. विक्र मगड तालुक्यात चोरट्या मार्गाने डबर, माती, खडी अशा गौण खनिजाची वाहतूक व उत्खन्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून इष्टांकानुसार दंड वसुलीचे आदेश दरवर्षी प्रत्येक तहसील कार्यालयास देण्यात येत असतात. त्यामध्ये विक्रमगड तहसीलकरिता जमीन महसुलाचे उद्दिष्ट ९० लाख होते. त्यामध्ये ४३.३१ टक्के वसुली करण्यात आली आहे, तर गौण खनिजामध्ये उद्दिष्ट १ कोटी १६ लाख ४५ हजारचे होते. त्यामध्ये ९२.१४ टक्के वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने गौण खनिज वाहतूक करणाºयांना या दंड वसुलीतून चांगलाच चपराक मिळालेला आहे. परंतु महसूल विभागाने विक्रमगड तालुक्यात कर्मचारी वर्ग अपुरा असतानाही तसेच इतर विभागाची कामेही महसूल विभागाला पाहावी लागत असतानाही याबाबत सतर्कराहून वेळोवेळी मोहीम राबवून चोरट्या गौण खनिजांची वाहतूक करणाºया वेगवेगळ्या गाड्या पकडून तब्बल १ कोटी ७ लाख ३० हजारांची गौण खनिज दंड वसुली करून व जमीन महसूल दंड वसुलीमध्ये ३८ लाख ९८ हजाराची शासनाच्या तिजोरीत भर पाडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चोरट्या मार्गाने गौण खनिज उत्खनन करणाºयांचे धाबे दणाणले आहे. या वर्षभरात अशीच मोहीम राबवून दंड वसुली केली जाईल, असे निवासी तहसिलदार सुरेश कामडी यांनी सांगितले.
तालुक्यातील गौण खनिज उत्खनन करणारे व त्यावर व्यवसाय करणाºयांनी तहसील कार्यालयाकडून अधिकृतरीत्या परवानगी (रॉयल्टी) घेऊन शासनाचे व स्वत:चे होणारे नुकसान टाळण्यासाठी सहकार्य करावे. - श्रीधर गालिपेल्ली, विक्रमगड तहसिलदार