अल्पवयीन मुलगी ठरली तीन हैवानांची शिकार; पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यात सापडली होती!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 09:47 AM2021-08-29T09:47:15+5:302021-08-29T09:48:06+5:30

अजय जैस्वाल, मुन्ना यादव आणि अक्रम चौधरी अशी या तीन आरोपींची नावे असून त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

The minor girl became the victim of three beasts; she was found in the coach of the Western Railway pdc | अल्पवयीन मुलगी ठरली तीन हैवानांची शिकार; पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यात सापडली होती!

अल्पवयीन मुलगी ठरली तीन हैवानांची शिकार; पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यात सापडली होती!

Next

पालघर : पालकांनी सोडलेली एक अल्पवयीन मुलगी तीन हैवानांची शिकार ठरल्याची बाब उघड झाली असून पश्चिम रेल्वे पोलीसच (जीआरपी) सध्या या मुलीवर उपचार आणि तिचे पुनर्वसन करत आहेत. ही मुलगी २ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या महिला डब्यात सापडली होती. 

वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, तपास अधिकारी बापूसाहेब बागल व त्यांच्या पथकाने कुठलाही धागादोरा नसताना कौशल्यपूर्ण तपास करून दोन दिवसांत मुख्य आरोपी अजय याला गजाआड केले. त्यानंतर अन्य दोन आरोपींना अटक केली. अजय जैस्वाल, मुन्ना यादव आणि अक्रम चौधरी अशी या तीन आरोपींची नावे असून त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अल्पवयीन मुलीस पळवून केला बलात्कार; तीन संशयित राहिले बाजूला, निघाला भलताच आरोपी

दरम्यान, ती मुलगी अद्याप दवाखान्यात उपचार घेत आहे. तिच्याकडून कोणतीही पूर्ण माहिती मिळाली नसतानाही पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. या मुलीच्या नातेवाईकांचा  शोध घेतला, परंतु ते सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांनीच तिचे आई-वडील बनून तिची काळजी घेत आहे.

तपास अधिकाऱ्यांकडे फक्त अजय हे एकच नाव होते. याप्रकरणी वसई जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. आम्ही शेकडो लोकांची चौकशी केली आणि किमान ४० जणांना पोलीस ठाण्यात आणले. त्यापैकी पाच संशयित म्हणून शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. त्यातून तीन आरोपींना अटक केली आहे.
- प्रदीप चव्हाण, पोलीस उपायुक्त, पश्चिम रेल्वे (जीआरपी)
 

Web Title: The minor girl became the victim of three beasts; she was found in the coach of the Western Railway pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.