मीरा भाईंदर महानगरपालिकेने महिलांना वाटले कचऱ्याचे डबे आणि दळण यंत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2023 08:14 PM2023-02-19T20:14:01+5:302023-02-19T20:14:25+5:30

महिलांच्या सक्षमिकरणासाठी महानगरपालिका सदैव कटिबद्ध असून महिला व बालकल्याण विभागाने आतापर्यंत महिलांसाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत.

Mira Bhayander Municipal Corporation distributed waste bins and grinding machines to women | मीरा भाईंदर महानगरपालिकेने महिलांना वाटले कचऱ्याचे डबे आणि दळण यंत्रे 

मीरा भाईंदर महानगरपालिकेने महिलांना वाटले कचऱ्याचे डबे आणि दळण यंत्रे 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील गरजू महिलांना स्वयंरोजगारसाठी दळण दळण्याचे यंत्र तसेच ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी कचऱ्याचे डबे वाटले . 

आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत महिला व बालकल्याण विभागामार्फत महानगरपालिकेच्या सर्व महिलांकरिता पर्यावरणाचे संवर्धन व जनजागृती करणेकामी सांस्कृतिक कार्यक्रम, हळदीकुंकू अंतर्गत ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी कचऱ्याचे डबे भेट म्हणून देण्यात आले .  तसेच शहरातील गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारकरीता मल्टिग्रेन आटा मशीन वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 

महिलांच्या सक्षमिकरणासाठी महानगरपालिका सदैव कटिबद्ध असून महिला व बालकल्याण विभागाने आतापर्यंत महिलांसाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यात स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात महिलांसाठी मॅमोग्राफी मशीन उपलब्ध करून दिली आहे. महिलांना सक्षम व आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने  महिला भवनाची निर्मिती केली आहे .  महिलांना कापडी पिशवी बनविणे , मेहंदी व नेल आर्ट , फॅशन डिझाईन, वाहन चालवणे, बेसिक कॉम्प्युटर टॅली, ज्युडो कराटे, एमएस - सीआयटी, वेब डिझाईन व योग आदी प्रशिक्षण देऊन महिलांना अधिक सक्षम करण्याचा ध्यास महापालिकेने घेतला असल्याचे आयुक्त ढोले यावेळी म्हणाले. 

अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, कल्पिता पिंपळे, संजय शिंदे व रवी पवार, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व महिला वर्ग उपस्थित होते.

Web Title: Mira Bhayander Municipal Corporation distributed waste bins and grinding machines to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.