मीरा भाईंदर महापालिकेच्या बस भाड्यात तब्बल ४ ते १३ रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 11:53 PM2022-04-21T23:53:43+5:302022-04-21T23:53:48+5:30

मीरा भाईंदर महापालिकेने परिवहन सेवा महालक्ष्मी कृपा ह्या ठेकेदारास फेब्रुवारी २०२१ पासून चालवण्यास दिली आहे .

Mira Bhayander Municipal Corporation's bus fare proposal of Rs. 4 to 13 hike | मीरा भाईंदर महापालिकेच्या बस भाड्यात तब्बल ४ ते १३ रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव 

मीरा भाईंदर महापालिकेच्या बस भाड्यात तब्बल ४ ते १३ रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने परिवहन सेवेतील साध्या बसचे भाडे किमान ४ रुपयां पासून कमाल १३ रुपये भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे . तर वातानुकूलित बसच्या भाड्यात मात्र कपात करण्याचे प्रस्तावित आहेत . 

मीरा भाईंदर महापालिकेने परिवहन सेवा महालक्ष्मी कृपा ह्या ठेकेदारास फेब्रुवारी २०२१ पासून चालवण्यास दिली आहे . पालिकेच्या बस ह्या ठेकेदारास मोफत चालवण्यास मिळाल्या असून एकूण ७४ बस पैकी त्यात ५ वातानुकूलित वोल्वो बस चा समावेश आहे . ठेकेदार तिकीटाचे उत्पन्न घेतोच शिवाय महापालिका ठेकेदारास प्रति किमी मागे सध्या २८ . २० रुपये प्रमाणे दरमहा लाखो रुपये अदा करत आहे.  

मे २०१९ मध्ये डिझेलचे दर ६७ रुपये ६७ पैसे इतके होते ते सध्या १०२ ते १०४ रुपये इतके आहेत . आयुक्त दिलीप ढोले यांनी भाडेवाढीचा प्रस्तावात सध्या आकारले जाणारे  साध्या बसचे भाडे हे सप्टेंबर २०१३ सालात प्रादेशिक परिवहन विभागाने मंजूर केलेले आहे . तर वातानुकूलित बसचे भाडे हे ऑगस्ट २०१६ मध्ये मंजूर केलेले आहे . त्या नंतर आज पर्यंत तिकीट दरात भाडेवाढ केली गेलेली नाही . महापालिकेवरील परिवहन उपक्रमाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रवासी भाडेवाढ करणे क्रमप्राप्त असल्याचे आयुक्तांनी नमूद करत ठाणे व नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेचे तुलनात्मक भाडे सुद्धा प्रस्तावित भाडेवाढी सह महासभेस सादर केले आहेत . 

सध्या पालिकेचे किमान भाडे २ किमी पर्यंत ६ रुपये असून ते १० रुपये करण्याचे प्रस्तावित आहे .  याशिवाय ८ रु . चे १० रु . ; ११ व १३ रु . चे १५ रु . ;  १५, १७ व १८ रुपये भाडे २० रुपये अश्या पद्धतीने प्रत्येकी तीन टप्प्यास ५ रुपये वाढ करण्याचे सुचवले आहे . अध्याचे कमाल ३२ रुपये भाडे हे ४५ रुपये करण्याचे प्रस्तावित आहे . 

साध्या बसचे भाडे एकूण ४ रुपयां पासून १३ रुपयां पर्यंत वाढवावे असे आयुक्तांनी नमूद केले आहे . वातानुकूलित बसच्या भाड्यात मात्र आयुक्तांनी कपात करण्याचे सुचवले आहे . वातानुकूलित बसचे सध्याचे किमान भाडे २० रुपयां वरून १५ रुपये तर कमाल १०० रुपयांवरून ८० रुपये असे ५ ते २० रुपयांनी कमी करण्याचे प्रस्तावित आहे . 

याशिवाय पालिकेच्या बस भाड्याने व शूटिंग साठी दिल्या जाणार आहेत . २०० किमी अंतरा साठी किंवा ८ तासासाठी व्होल्वो बस साठी १८ हजार , सर्वसाधारण बस साठी ९ हजार तर मिडी बस साठी ८ हजार रुपये भाडे आकारणी प्रस्तावित आहेत . त्यात शाळा , पोलीस , महापालिका व अन्य शासकीय कामकाज साठी त्यात १० टक्के सवलत तर शूटिंगसाठी २० टक्के ज्यादा भाडे आकारले जाणार आहे . एकीकडे महापालिका निवडणूक तोंडावर असताना बस प्रवासी भाडेवाढ करण्यास सत्ताधारी भाजपा कडून महासभेत मंजुरी दिली जाईल का ? हे येणाऱ्या महासभेत स्पष्ट होणार आहे . 

Web Title: Mira Bhayander Municipal Corporation's bus fare proposal of Rs. 4 to 13 hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.