मीरारोडला स्त्री बोगस डॉक्टरला अटक

By admin | Published: August 30, 2016 02:19 AM2016-08-30T02:19:46+5:302016-08-30T02:19:46+5:30

मीरा रोड, दहिसर भागांत १२ वर्षे डॉक्टर म्हणून व्यवसाय करणारी तसेच दहिसर लायन्स क्लबची अध्यक्षा सुनीता प्रवीण छाजेड ही बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे.

Mirrodal gets bogus doctor arrested | मीरारोडला स्त्री बोगस डॉक्टरला अटक

मीरारोडला स्त्री बोगस डॉक्टरला अटक

Next

मीरा रोड : मीरा रोड, दहिसर भागांत १२ वर्षे डॉक्टर म्हणून व्यवसाय करणारी तसेच दहिसर लायन्स क्लबची अध्यक्षा सुनीता प्रवीण छाजेड ही बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे. काशिमीरा पोलिसांनी तिला अटक केली आहे. भार्इंदर पूर्वेलाही एका बोगस डॉक्टरला अटक केली आहे.
दहिसर, कांदिवली तसेच मीरा रोड परिसरात स्वत:ला डॉक्टर तसेच गायनाकोलॉजिस्ट म्हणवणारी सुनीता उघडपणे वैद्यकीय व्यवसाय करत आहे. शिवाय, लायन्स क्लब दहिसरची अध्यक्षा असून क्लबच्या माध्यमातून वैद्यकीय शिबिरे घेते. मिळालेल्या माहितीनंतर संस्थेच्या सदस्या तथा दंतचिकित्सक असलेल्या डॉ. माया पाटील या स्वत: रुग्ण म्हणून सुनीताच्या घरी गेल्या. सुनीता हिने आपण एमडी गायनॅक असल्याचे सांगून तपासणी केली. सोनोग्राफी करावी लागेल, रक्त-लघवी तपासणी करून घ्या, असे सांगत लॅबची चिठ्ठी व औषधे लिहून दिली. खात्री पटल्याने संस्थेचे सचिव गणेश फडके आणि सदस्यांनी महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, डॉ. अंजली पाटीलसह सुनीता हिच्या निवासस्थानी धाड टाकली. त्या वेळी अन्य रुग्णही तपासणीकरिता आले होते.
शनिवारी सायंकाळी काशिमीरा पोलीस ठाण्यात डॉ. जाधव यांच्या फिर्यादीनंतर सुनीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनीताकडे डी. फार्मची पदवी असून वैद्यकीय व्यवसायाची कुठलीही पदवी नसल्याचे स्पष्ट झाले. सुनीताचा पती प्रवीण डॉक्टर म्हणून दहिसरमध्ये दवाखाना चालवतो. शिवाय, मीरा रोडच्या विजय पार्कमध्ये छाजेड हे साईयश नावाचे रुग्णालय चालवत होते.
दरम्यान, या संस्थेने भार्इंदर पूर्वेतून एक बोगस डॉक्टर पकडून दिला. मोहम्मद हदीस शेख (४३) असे त्याचे नाव असून तो जैननगरमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत होता. (प्रतिनिधी)

Web Title: Mirrodal gets bogus doctor arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.