मीरारोड : प्रभाग अधिकारी व लिपीक मिळत नसल्याने सभापतींनी पुन्हा ठोकले दालनाला टाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 04:46 PM2018-01-04T16:46:35+5:302018-01-04T16:51:40+5:30

प्रभाग समितीसाठी पुर्णवेळ प्रभाग अधिकारी तसेच लिपीक देखील मिळत नसल्याने अखेर सभापती संजय थेराडे यांनी आज गुरुवारी पुन्हा आपल्या दालनास टाळे ठोकुन पालिकेचा निषेध केलाय. अधिकारी नसल्याने कामकाज बंद केल्याचा फलक देखील लावलाय.

Mirror: The board members and the clerk are not getting the speakers, because the chairmen again rebuild the room | मीरारोड : प्रभाग अधिकारी व लिपीक मिळत नसल्याने सभापतींनी पुन्हा ठोकले दालनाला टाळे

मीरारोड : प्रभाग अधिकारी व लिपीक मिळत नसल्याने सभापतींनी पुन्हा ठोकले दालनाला टाळे

googlenewsNext

मीरारोड:  प्रभाग समितीसाठी पुर्णवेळ प्रभाग अधिकारी तसेच लिपीक देखील मिळत नसल्याने अखेर सभापती संजय थेराडे यांनी आज गुरुवारी पुन्हा आपल्या दालनास टाळे ठोकुन पालिकेचा निषेध केलाय. अधिकारी नसल्याने कामकाज बंद केल्याचा फलक देखील लावलाय.  

राजकिय फायद्यासाठी सत्ताधारी भाजपाने बहुमताने मंजुर करुन घेतली. त्या नंतर सर्वच प्रभाग समित्यांवर भाजपाचे सभापती निवडून आले. पण सभापतींनी पदभार स्वीकारुन कामकाज सुरु केली असता प्रभाग अीधकारीच नसल्याने प्रभाग समिती ४ चे संजय थेराडे व प्रभाग समिती ६ चे सभापती आनंद मांजरेक र यांनी आपल्या दालनांना टाळं ठोकलं होतं. त्या नंतर प्रभाग समिती ६ साठी अधिकारी दिला. तर प्रभाग समिती ३ व ४ साठी मात्र एकच प्रभाग अधिकारी देण्यात आला. भार्इंदर पूर्व पासून थेट घोडबंदर व नया नगर मधला परीसर या दोन्ही समित्यांमध्ये येतो. त्यातही कनिष्ठ अभियंता देखील एकच होता. थेराडे यांनी २ डिसेंबर रोजी पत्र देऊन स्वतंत्र प्रभाग अधिकारी मागीतला. पण अजुनही स्वतंत्र प्रभाग अधिकारी तर दिला नाहीच शिवाय एक लिपीक देणं सुध्दा प्रशासनास जमलं नसल्याने थेराडे संतप्त झाले आहेत.

प्रभाग समिती इतकी मोठी आहे की नागरीकांना कार्यालयात येण्यासाठी खुपच त्रास होतो. आर्थिक भुर्दंड पडतो. त्यातही कार्यालयात आल्यावर प्रभाग अधिकारी तसेच लिपीक नसल्याने कामंच होत नाहित. नागरीक व नगरसेवकांच्या तक्रारी, कामं प्रलिंबित असुन जर कामंच होत नसतील तर पदावर बसुन उपयोग काय ? असा सवाल थेराडे यांनी केलाय.

आयुक्तांना त्यांनी पत्र देऊन अधिकारी व लिपीकची मागणी केली असुन ते देत नाहि तो पर्यंत कार्यालय बंद केलं आहे. कार्यालयाच्या दारावर त्यांनी तशी सुचना पण लावली आहे.

Web Title: Mirror: The board members and the clerk are not getting the speakers, because the chairmen again rebuild the room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.