वाहतूककोंडीची ‘दिशाभूल’
By admin | Published: January 28, 2017 02:30 AM2017-01-28T02:30:16+5:302017-01-28T02:30:16+5:30
पालघर-बोईसर रस्त्या दरम्यान उमरोळी-पंचाळी येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या नावाखाली गुरु चरण ची पर्यायी जागा देण्यात येईल
पालघर : पालघर-बोईसर रस्त्या दरम्यान उमरोळी-पंचाळी येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या नावाखाली गुरु चरण ची पर्यायी जागा देण्यात येईल असे सांगून लोकांची दिशाभूल केली जात असल्याची बाब समोर आली आहे. यासाठी जी पर्यायी जागा सुचिवली जात आहे ती महसूल विभागाच्या अखत्यारीतील असून प्रांतांच्या परवानगीने गावठाण विस्तार मंजूर न करताच रस्त्यासाठी देण्यात येणाऱ्या जागाच्या मोबदल्यात दीड गुंठे गावठाण जमीन देण्याच्या तोंडी आश्वासनाला कुठलाही कायदेशीर आधार नसल्याचे समोर आल्याने भविष्यात लोकांची फसगत होण्याची शक्यता आहे.
पालघर बोईसर दरम्यानच्या उमरोळी पंचाळी गावात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रास्तरु ंदी करणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असून ७ मिटर रस्त्याचे रु ंदीकरण करण्यात येऊन रस्त्यांच्या दोन्हीचा बाजूला गटारे उभारण्यात येणार आहेत. २ कोटी २५ लाख किमतीचे हे काम असून या कामाचा ठेका मा. वैष्णव देवी इंटरप्रायजेस चे मालक व उमरोळी चे सरपंच प्रभाकर पाटील ह्यांना देण्यात आला आहे.
या रस्त्यांचे कामे करताना रस्त्यालगत असणारी घरे, बांधकामे तोडण्यात येत असून ह्या नुकसानीच्या पोटी लोकांना गुरूचरण जमिनीतून प्रत्येकी दीड गुंठे जागा देण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीच्या वतीने लोकांना देण्यात आल्याचे स्थानिक सांगत आहेत. मात्र कायदेशीर रित्या महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेली ही जमिन ग्रामपंचायत कोणत्या कायद्याच्या आधारे बाधितांना देत आहे? हा प्रश्न बाधिता कडून उपस्थित केला जात आहे. ह्या उलट ग्रामपंचायत मात्र तुम्हाला दीड गुंठे जागा देऊ त्यावर तुम्ही घरे बांधा,ग्रामपंचायत तुम्हाला घरपट्टी लावून देईल. असे सांगत आहे. मात्र महसूल खात्याच्या अखत्यारीतील ही जमीन अशा प्रकारे भूखंड पाडून संबंधितांना द्यायची असल्यास महसूल विभागा कडून कायदेशीर गावठाण विस्तार मंजूर करून घेणे आवश्यक आहे, अशी कोणतीही प्रक्रि या न करताच भूखंडाचे आमिष दाखिवले जात असल्याने बाधितांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यात त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)