डहाणू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमदार आनंद ठाकूर
By admin | Published: December 27, 2016 02:26 AM2016-12-27T02:26:57+5:302016-12-27T02:26:57+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमदार आनंद ठाकूर तर उपसभापतीपदी मुकुंदआप्पा चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ठाकूर हे चौथ्यांदा यापदी
डहाणू : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमदार आनंद ठाकूर तर उपसभापतीपदी मुकुंदआप्पा चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ठाकूर हे चौथ्यांदा यापदी निवडून आले आहेत. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणुन सहा. निबंधक अधिकारी विजय पाटील यांनी तर सहाय्यक म्हणून अण्णा पाटील यांनी काम पाहीले.यावेळी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळातून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्यासाठी संचालक मंडळापैकी माजी उपसभापती राजेश पारेख, सुरेंद्र पाटील, रमेश कर्नावट, शिम पीरा, शशीकांत बारी, पांडुरंग बेलकर, हरेश्वर दिवे, दिलीप राऊत सतीश पटेल,सतीश पाटील,रमेश पडवळे, संतोष आदी उपस्थित होते. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर सभापती आणि उपसभापतीपदासाठी एकेकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा राष्ट्रवादीनेच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आगामी काळात डहाणू तालुक्यातील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, प्रगतीशील शेतकरी घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार आनंद ठाकूर यांनी यावेळी सभापतीपदाच्या निवडीनंतर दिली.सूत्रसंचलन राजेश पारेख यांनी तर आभार संचालक रमेश कर्नावट यांनी मानले.सचिव हिरेंद्र पाटील यांनी ही निवडणूक सरळीत पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. (वार्ताहर)