कामगारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; आमदार श्रीनिवास वणगा अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:22 PM2020-04-10T23:22:15+5:302020-04-10T23:24:34+5:30
त्याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मतदारांमधून आता केली जात आहे.
पालघर :- मंगळूर येथे मच्छीमारी ट्रॉलर्स वर रोजगारासाठी गेलेले जिल्ह्यातील आदिवासी कामगार कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. आपल्या सुटकेसाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करण्याची विनंती करणाऱ्या कामगारांना आईवरून घाणेरड्या शब्दाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारे आणि मला विचारून मंगळुरूला गेला होतास का? जिथे गेला आहेस तिथेच राहा, असे बेजबाबदार वक्तव्य करणारे पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वणगा चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
त्याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मतदारांमधून आता केली जात आहे. ह्या पार्श्वभूमीवर माझे कॉल रेकॉर्डिंग करणारी व्यक्ती तलासरीमधून एका पाड्यातून बोलत असल्याचे सांगून मला फसविण्याचे षडयंत्र असल्याचा खुलासा आमदार श्रीनिवास वणगा ह्यांनी सोशल मीडियावर केला असून, पोलिसात तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे.