अखेर आमदारांनी सोडविली मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी

By नितीन पंडित | Published: September 15, 2022 04:45 PM2022-09-15T16:45:13+5:302022-09-15T16:45:22+5:30

महामार्गावरून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे जात असताना ते देखील या वाहतूक कोंडीत अडकले होते.

MLAs finally solved the traffic jam on the Mumbai-Nashik highway | अखेर आमदारांनी सोडविली मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी

अखेर आमदारांनी सोडविली मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी

googlenewsNext

भिवंडी- भिवंडीतील मुंबई नाशिकमहामार्गावर गुरुवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांचंसह स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होताअर्धा- अर्धा तास वाहने जागच्या जागीच उभी असल्याने प्रवासी हैराण झाले होते.

या महामार्गावरून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे जात असताना ते देखील या वाहतूक कोंडीत अडकले होते. अखेर आमदार मोरे यांनी आपल्या पोलीस फाट्यासह  मुंबई नाशिक महामार्ग वरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका केली. पडघा येथील टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या असल्यामुळे टोल कंपनीला धारेवर धरत वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी टोल न भरता आमदारांनी वाहने सोडून दिल्याने नागरिकांना काही वेळा नंतर वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला. 

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी टोल कंपनी नागरिकांना वेठीस धरू शकत नाही,येत्या आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे व वाहतूक कोंडीबाबत टोल कंपनीने योग्य नियोजन केले नाही तर टोल कंपनी विरोधात विधानसभेत आवाज उठवू असा इशारा देखील आमदार शांताराम मोरे यांनी टोल कंपनीस दिला आहे.

Web Title: MLAs finally solved the traffic jam on the Mumbai-Nashik highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.