मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत - जिग्नेश मेवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:02 AM2018-12-29T05:02:28+5:302018-12-29T05:02:40+5:30

मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. नाटके करण्यात हुशार असल्याने ते खरे ‘नटसम्राट’ आहेत. भाजपा सरकार गरिबांचा नाही, तर अंबानी-अदानींसारख्या बड्या उद्योजकांचा विकास करीत आहे.

 Modi is working to divide the country - Jignesh Mawney | मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत - जिग्नेश मेवाणी

मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत - जिग्नेश मेवाणी

Next

वसई : मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. नाटके करण्यात हुशार असल्याने ते खरे ‘नटसम्राट’ आहेत. भाजपा सरकार गरिबांचा नाही, तर अंबानी-अदानींसारख्या बड्या उद्योजकांचा विकास करीत आहे. बुलेट ट्रेनच्या नावाखाली वसईतील हरितपट्टा नष्ट करण्याचे धोरण सरकारने अवलंबिले असल्याची टीका गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केली.
वसईमध्ये नव्याने विकसित होणाऱ्या बुलेट ट्रेन व मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या विकास आराखड्याच्या प्रकल्पाला हजारो ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या प्रकल्पाविरोधात वसई पर्यावरण समिती व ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मेवाणी येथे आले होते. या वेळी भूमीसेना संस्थापक काळूराम धोदडे, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, नगररचनाकार चंद्रशेखरप्रभू आदी उपस्थित होते.
एमएमआरडीएने मुंबईसह वसई-विरार, भार्इंदर, ठाणे, पनवेल, रायगड, उरण, अलिबाग या महानगर प्राधिकरण क्षेत्रासाठी २०१६ ते २०३६ असा २० वर्षांसाठीचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. मात्र, हा आराखडा शेतकरी व भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा असल्याने त्याला विरोध झाला आहे. वसई विरारमधून या आराखड्या विरोधात ३५ हजारांहून अधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

बुलेट ट्रेनलाही विरोध

तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पालादेखील येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प वसई-विरारवासीयांच्या फायद्याचा नसतानाही स्थानिकांना उध्वस्त करण्याचा डाव प्रशासनाने आखला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विकासाच्या नावाखाली वसईतून कोस्टल कॉरीडोर रोड, बुलेट ट्रेन, रेल्वे कॉरीडोर, औद्योगिक क्षेत्र, असे प्रकल्प राबविले जाणार असल्याने येथील शेतकरी, मच्छीमारबांधव व भूमिपुत्र उद्धवस्त होणार असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Web Title:  Modi is working to divide the country - Jignesh Mawney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.