मोखाडा बीडीओने हात झटकले, बेलगाम पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला आवरणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:32 AM2018-11-12T05:32:43+5:302018-11-12T05:33:03+5:30
तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचवावा यासाठी पंचायत समिती च्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण योजनाचा लाभ त्यांना मिळवून दिला जातो
रविंद्र साळवे
मोखाडा : पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागला पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील कारभार रामभरोसे असून आंधळं दळते कुत्रं पिठ खाते अशी काहीशी परिस्थिती या कार्यालयाची झाली आहे. मात्र मोखाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता भांगरे ह्या मूग गिळून गप्प आहेत यामुळे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी पाटील यांच्या भोंगळ कारभाराला आवर घालणार कोण? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. पशुवैद्यकीय अधिकारी अजय कांबळे यांची बदली झाल्याने गेल्या चार महिन्यापासून हे पद रिक्त आहे यामुळे डॉ बी के पाटील हे प्रभारी म्हणून कारभार बघत आहेत परंतु त्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पशुसंवर्धन विभागातील विविध योजनाना ब्रेक लागला आहे
तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचवावा यासाठी पंचायत समिती च्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण योजनाचा लाभ त्यांना मिळवून दिला जातो. यामध्ये अनुदानीत संकरीत गाय व म्हैस वाटप योजना, अनुदानीत समृध्द योजनेतून भांडी पुरवठा, तबेले धारकांना खोडा वाटप तसेच दुधाळ जनावरे व दुभत्या जनावरांसाठी पशुखाद्य वाटप, वंधत्व निवारण शिबीरे, आदी योजना या विभागाच्या अंतर्गत राबविल्या जात असून त्याचबरोबर गाई बैल म्हैस यांच्या निवाº्याची व्यवस्था व्हावी यासाठी रोहयो अंतर्गत गोठ्यांची बांधणी करण्याची योजनाही राबविली जाते. या योजनेतील ही प्रकरणे पशुसंवर्धन विभागाने तपासून रोहयो विभागाला पाठवायची असतात. परंतु पशुसंवर्धन विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील गोठ्यांची शेकडो प्रकरणे गेल्या वर्षभरापासून धूळखात पडली आहेत.
यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अधून - मधून कार्यालयात येणारे बी के पाटील यांच्या अनागोंदी कारभारामुळे गोठयांच्या प्रकरणासह विविध योजनांची प्रकरणे टेबलावर धूळखात पडली आहेत. यामुळे येथील आदिवासी बांधव आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
जर याबाबत लवकर निर्णय झाला नाही तर शेतकरी उग्र आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.
याबाबत गटविकास अधिकारी संगीता भांगरे यांना विचारणा केली असता आम्ही काहीही करू शकत नाही त्यांच्यावर जिल्ह्यावरून कारवाई केली जाऊ शकते असे उत्तर माध्यमांना देऊन आम्ही त्यांना पाठीशी घालतो किंवा मोकाट सोडतो आहोत याची जणू काही कबुलीच दिली.
यामुळे विकास कामांना कशी चालना मिळणार.? असा प्रश्न निर्माण झाला आहे मुळात संबंधित अधिकाº्याची बदली झाल्यावर त्या ठिकाणी दुसरा अधिकारी आल्यावरच त्यांना कार्यमुक्त केले जाते.
येथे कार्यरत असलेले पशू वैद्यकीय अधिकारी अजय कांबळे यांची चार महिन्यांपूर्वी बदली झाल्याने येथील पशू वैद्यकीय अधिकारी पद रिक्त झाले व मोखाडा येथील पशु धन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पाटील यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला यामुळे पाटील मोखाडा पशु वैद्यकीय दवाखाना व मोखाडा पंचायत समितीचे पशुसंवर्धन विभाग सांभाळत आहे त्यातच कामसू वृत्तीचा अभाव असल्याने विविध योजनांना ब्रेक लागला आहे व लाभार्थ्यांची कुचंबणा होत आहे.