मोखाडा रुग्णालयाला अच्छे दिन कधी?

By Admin | Published: September 13, 2016 02:01 AM2016-09-13T02:01:04+5:302016-09-13T02:01:04+5:30

संपूर्ण तालुक्याच्या आरोग्याची काळजी घेणारे मोखाड्याचे ग्रामीण रुग्णालयच आजारी असल्याने येथील आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Mokhada hospital is a good day? | मोखाडा रुग्णालयाला अच्छे दिन कधी?

मोखाडा रुग्णालयाला अच्छे दिन कधी?

googlenewsNext

रविंद्र साळवे, मोखाडा
संपूर्ण तालुक्याच्या आरोग्याची काळजी घेणारे मोखाड्याचे ग्रामीण रुग्णालयच आजारी असल्याने येथील आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असून दाखल झालेल्या रुग्णांनाप्रमाणेच ५०० पेक्षा अधिक रुग्णांना ओपीडीमध्ये उपचार दिला जातो. परंतु येथील सोईसुविधा व रिक्तपदाचा प्रश्न अजतागायत सुटला नसल्याने प्रशासन आदिवासीच्या जीवाशी किती दिवस खेळणार ? असा प्रश्न प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे. या रुग्णालयातील डॉक्टरांची २ पदे गेल्या दोन वर्षापासून रिक्त असून सध्या दोनच डॉक्टरांना संपूर्ण रुग्णल्याचा भार उचलावा लागत असून त्यांना २४ तास आॅन ड्युटी राहावे लागत असल्याने त्यांच्यावरचा ताण वाढला आहे.
३५ वर्षपूर्वी या रुग्णालयाची निर्मीती झाली. तालुक्याची लोकसंख्या लाखाच्या घरात पोहचली आहे.
परंतु हे रुग्णालय समस्याच्या विळख्यातून सुटलेले नाही.या रुग्णालयातील एक नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, सफाई कामगार अशी पदे रिक्त आहेत मोखाडा तालुका कुपोषणग्रस्त असूनसुद्धा या रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ, बाल रोगतज्ज्ञ नाहीत. ते कधी लाभणार हे अनुत्तरीत आहे.

Web Title: Mokhada hospital is a good day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.