विद्यार्थिनींचा विनयभंग : अधीक्षकाला बेदम चोप, सहकारी शिक्षकांची बघ्याची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 02:50 AM2018-03-04T02:50:38+5:302018-03-04T02:50:38+5:30
आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळा धामणगाव मधील अधीक्षकानेच दहावीत शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थिनींचा विनयभंग केला. या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन अधिक्षकला अटक करण्यात आली आहे.
- सुरेश काटे
तलासरी : आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळा धामणगाव मधील अधीक्षकानेच दहावीत शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थिनींचा विनयभंग केला. या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन अधिक्षकला अटक करण्यात आली आहे.
धामणगाव शासकीय आश्रम शाळा मधील अधीक्षक सूर्यकांत बागल याने आपला शाळेच्या आवारात डिसेंबर महिन्यात विनयभंग केला असल्याची तक्रार दहावीत शिकत असलेल्या पंधरा वर्षीय विद्यार्थीनीने तलासरी पोलीस स्टेशन मध्ये केली.
अधीक्षक सूर्यकांत बागल याने डिसेंबर महिन्यात आपल्याला मनास लज्जा निर्माण होईल अशा प्रकारचा स्पर्श केला असे तिने शुक्रवारी वर्ग मित्रांना व घरच्यांना सांगितल्यावर मुलीचे नातेवाईकांनी शाळेत येऊन अधीक्षकास बेदम चोप देऊन तलासरी पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ मुलीची जबानी घेऊन अधिक्षकास अटक केली, या बाबत शुक्र वारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात येऊन आज त्यास न्यायालयापुढे उभे करण्यात आले.
तर प्रकल्प कार्यालयाचे सहा. प्रकल्प अधिकारी संगीता हुलावळे यांनी आश्रम शाळेला भेट देऊन माहिती घेतली व योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट केले. याबाबत त्यांनी लोकमतला सांगितले महिला अधिक्षकेचे पद रिक्त असून ते तात्काळ भरण्याची कारवाई येत आहे, नवीन इमारतीत निवासस्थान ची सोय नाही.
धामणगाव आश्रम शाळेत घडलेल्या या घटनेला प्रकल्प कार्यालय ही तितकेच जबाबदार आहे आश्रम शाळेत दहावी पर्यंत मुले मुली असतांना या आश्रम शाळेत मुली साठी स्वतंत्र महिला अधिक्षकेची नेमणूक करण्यात आलेली नाही. महिला अधिक्षकेचे पद रिक्त आहे. तसेच या आश्रम शाळेत शिक्षकाना राहण्यासाठी निवासाची कोणतीही व्यवस्था नाही त्या मुळे शिक्षक शहराच्या ठिकाणी राहून ये जा करतात, तर मुख्याध्यापक कार्यालयातच झोपतो.
आश्रम शाळेच्या आवारात पीडित मुलीचे नातेवाईक व शाळेचे विद्यार्थी अधिक्षकास बेदम मारहाण करीत असतांना काही मुले त्याचे व्हिडीओ चित्रण करीत होती. सहकारी शिक्षकांनी मात्र यावेळी बघ्याची भूमिका घेतली. याची माहिती मिळताच तलासरी पोलीस तात्काळ आश्रम शाळेत पोहोचले व ग्रामस्थांच्या तावडीतून अधीक्षकांनी सुटका करून पोलीस स्टेशनला आणले.
तक्रारीमध्ये तफावत एवढा उशीर का?
या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी विद्यार्थीनीच्या तक्रारीमध्येच तफावत असल्याची स्थिती आहे. तिने फिर्यादीमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये वसतिगृहामध्ये असतांना घरच्यांचा फोन आल्याचे सांगून विनयभंग केल्याचे सांगितले आहे.
तर सहा. प्रकल्प अधिकारी संगीता हुलावळे यांच्याकडे व्यथा मांडतांना गणपतीमध्ये लज्जास्पद वर्तन केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, गैरवर्तन घडल्यानंतर एवढे महिने ती गप्प का बसली असाही प्रश्न उपस्थित होत आहे.