तलाठ्याच्या मनमानीचा खातेदारांना फटका

By admin | Published: March 21, 2017 01:36 AM2017-03-21T01:36:29+5:302017-03-21T01:36:29+5:30

कुडूस येथील मुसारणे सजेला असलेल्या तलाठी या आदिवासी व बिगरआदिवासींकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय कुठलेही काम

The moneylenders of the money launderer hit | तलाठ्याच्या मनमानीचा खातेदारांना फटका

तलाठ्याच्या मनमानीचा खातेदारांना फटका

Next

वाडा : कुडूस येथील मुसारणे सजेला असलेल्या तलाठी या आदिवासी व बिगरआदिवासींकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय कुठलेही काम करीत नाहीत. जे ती देत नाहीत त्या शेतकऱ्यांना अनेक वेळा तलाठी कार्यालयात यायला लावतात, अशी तक्रार करण्यात आली आहे.
कुडूस तलाठी कार्यालयात सीमा सांबरे या मुसारणे हद्दीतील शेतीविषयीची कामे करतात. मात्र शेतकरी आदिवासी असो वा बिगरआदिवासी असो सर्वांनीच त्यांना चिरीमिरी दिल्याशिवाय त्या कुठलेही काम करीत नाहीत. मुसारणे येथील एक शेतकरी वारसनोंद करण्यासाठी एक वर्ष फेऱ्या मारतो आहे. त्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून पायपीट करायला लावली जाते. तर अलिकडे गेल्या आठवडाभर पायपीट करीत असलेले अशोक पाटील चिंचघर येथील शेतकरी यांना ७/१२ साठी आॅनलाईनचे कारण देऊन फेऱ्या मारायला लावले जात आहे. सोमवार २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता कार्यालयात पाटील ७/१२ घेण्यासाठी गेले असता आॅनलाईन ओपन होत नाही व बाहेरील आॅनलाईन उताऱ्यावर आम्ही सही करीत नाही. असे उत्तर देऊन वाटेला लावले. मला वेळ मिळेल तेव्हा तुमचे काम करेन.मी येथे फक्त तलाठी नाही, माङयाकडे सर्कलचाही चार्ज असल्याने मी बिझी आहे, असे त्या सुनावतात. याच वेळी डॉ. वसंत हिरवे हे बाहेरून आॅनलाईन ७/१२ चा उतारा घेऊन आले, देवगांव सजेला असलेले तलाठी खराडे हे याच कार्यालयात दुसऱ्या टेबलवर बसतात त्यांनी लगेच त्याच उताऱ्यावर सही व शिक्का मारून दिला. मात्र सांबरे बाहेरुन काढलेल्या उताऱ्यावर स्वाक्षरी का करीत नाहीत? हा सवाल आहे.
तलाठी सांबरे त्यांची अन्यत्र बदली करावी. अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते धनंजय पष्टे यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: The moneylenders of the money launderer hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.