तारापूर मंडळ कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: February 21, 2017 04:01 AM2017-02-21T04:01:48+5:302017-02-21T04:01:48+5:30
जनरल कामगार युनियन (लालबावटा) आणि भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षातर्फे कामगार, मच्छीमार, प्रकल्पग्रस्त,
बोईसर : जनरल कामगार युनियन (लालबावटा) आणि भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षातर्फे कामगार, मच्छीमार, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, युवक व महिलाचा तारापूर (कुरगांव) मंडळ कार्यालया वर मोर्चा काढण्यात आला होता.
जनरल कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ. बळीराम चौधरी, जिल्हा सेके्रटरी कॉ. संज्योत राऊत, तालुका सेक्रेटरी, कॉ. महेश बारगा, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. राजेश दवणे, कॉ. श्याम नाईक, कॉ. प्रमिला हाडल, कॉ. साईनाथ तामोरे, कॉ. प्रतिक्षा धनु, कॉ. सुरेखा तामोरे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. त्यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये तारापूर अणूविद्युत प्रकल्पातील कामावरून कमी केलेल्या व बीएआरसी मधील कामावरून कमी केलेल्या कामगारांना न्याय द्या, आदी मागण्यांचा समावेश आहे. (वार्ताहर)