मारेकऱ्याचे फुटेज झाले व्हायरल

By admin | Published: January 28, 2016 02:22 AM2016-01-28T02:22:00+5:302016-01-28T02:22:00+5:30

दादर रेल्वे स्टेशनवर बसलेल्या एका अनोळखी महिलेचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढणाऱ्या हरीष पवार (४५) याला झालेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी

The mortal footage was viral | मारेकऱ्याचे फुटेज झाले व्हायरल

मारेकऱ्याचे फुटेज झाले व्हायरल

Next


पालघर : दादर रेल्वे स्टेशनवर बसलेल्या एका अनोळखी महिलेचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढणाऱ्या हरीष पवार (४५) याला झालेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पालघर रेल्वे पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या मारेकऱ्याचा फोटो व्हायरल झाला असून त्याची माहिती पोलीसांना कळवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशवरून दि. २४ जाने. संध्याकाळी १६.४५ वा. सुटणाऱ्या दादर-डहाणू मेमतून सफाळे या गावी जाण्यासाठी मृत हरिष पवार व त्याचा फिर्यादी मित्र संतोष भुसारा हे बसले असताना हरीष याने प्लॅटफॉर्मवर बसलेल्या एका अनोळखी महिलेचा आपल्या मोबाईलमधून फोटो काढला. हे त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने साथीदाराला ते सांगितले. त्याने हरीष याची मान दाबून पोटात लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. त्यानंतर आपल्या घरी येत असताना विरार स्टेशनातच हरिष अत्यवस्थ झाला व पालघर स्टेशन येईपर्यंत त्याला मृत्यूने गाठले. संशयीताच्या तपासासाठी शोध मोहीम हाती घेतलेली आहे. लवकरच ती यशस्व होईल असा त्याचा दावा आहे.

मारेकऱ्याचे फुटेज झाले व्हायरल

पोलिसांना कळवा
दादर स्टेशनवरील सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये या हाणामारीचे चित्रीकरण झाल्यानंतर आरोपी तरूणाचा फोटोही पोलीसांना मिळाला आहे. हा फोटो सध्या व्हॉटस्अ‍ॅपवर फिरत असून त्याची ओळख पटल्यास दादर रेल्वे पोलिसांना याची माहिती कळवावी असे पोलिसांनी कळविले आहे.

Web Title: The mortal footage was viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.